ETV Bharat / city

Mask Free Maharashtra : महाराष्ट्र मास्कमुक्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण

राज्यभरात कोरोनाची तिसरी लाट ओसरत आल्याचे चित्र असताना विविध ठिकाणी मास्क मुक्ती होणार ( Mask Free Maharashtra ) असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याचविषयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सद्यस्थितीत तरी मास्क मुक्ती होणे कठीण असून, मास्क बंधनकारक असल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्रात मास्क मुक्ती होणार..? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले..

author img

By

Published : Feb 22, 2022, 3:33 PM IST

Updated : Feb 22, 2022, 3:47 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी मास्क मुक्ती संदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, सध्या तरी मास्क मुक्ती ( Mask Free Maharashtra ) कठीण असून, मास्क लावणे बंधनकारक असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ( CM Uddhav Thackeray ) दिले. अलिबाग येथील उसरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( Government Medical Collage Alibaug ) व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) , राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) , आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) , मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Minister Vijay Vadettiwar ) , वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख ( Minister Amit Deshmukh ) , रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर आदी उपस्थित होते.

नुसत्या मागण्या करून उपयोग नाही, पाठपुरावाही करावा लागतो

गेल्या दोन वर्षात रुग्णालयाचे नूतनीकरण नवीन हॉस्पिटलचे उद्घाटन, श्रेणीवर्धनाचे जास्तीत जास्त काम महाराष्ट्रात झाले. आरोग्य सेवेला ब्रेक न लावता त्यात सातत्याने वाढ करावी लागली. संपूर्ण देशात महाराष्ट्रात राज्याने आव्हानाच्या परिस्थितीला तोंड देत, आरोग्य सुविधात प्रचंड वाढ केली. छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यात या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे भूमीपूजन होत आहे. शिवरायांच्या भूमीत आधुनिक सोयीसुविधा असलेले वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय उभे राहत आहे याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. अनेक मागण्या असतात, नुसत्या मागण्या करून काही होत नाही. त्याच्या पूर्णत्वासाठी पाठपुरावा करावा लागतो. आदिती तटकरे यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई - पुण्याच्या सीमा लाभलेल्या या जिल्ह्याला चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा मानस आहे. उद्योग व्यवसायाचा विकास करताना निरोगी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची

कोरोना अजून संपलेला नाही. मास्क कधी काढणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो, असे आताच काही सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. साथ शिखरावर असताना लसीकरण करणे कितपत योग्य हे डॉक्टर सांगतील. पण आता लाट कमी असताना लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होत आहे. मात्र, सध्या त्याची घातकता कमी असून, जीव वाचवण्याचे सुरक्षा कवच म्हणून लस महत्त्वाची आहे. तसेच अपघातग्रस्त भागात ट्रामा केअर सेंटर उभे करत आहोत. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्री ( Mask Is Compulsory Says CM Thackeray ) म्हणाले. ज्यांच्या रुग्णालय उभारणीसाठी सहकार्य लाभले त्यांचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आभार मानत, इमारत लवकरात लवकर बांधून रुग्णालय पूर्ण होईल यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

Last Updated : Feb 22, 2022, 3:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.