मुंबई - देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव पोलीस मुख्यालयात आदरांजली अर्पण करण्यात आली.
यानिमित्ताने पोलीस स्मृतिदिन संचलन समारंभ देखील पार पडला. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलातील विविध 26 पोलीस अधिकारी आणि 240 पोलीस अंमलदारांना आपले कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झाल्याबद्धल श्रद्धांजली वाहिली. या वीरश्रेष्ठांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.