मुंबई - निसर्ग चक्रीवादळ ३ जूनला महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावर धडकणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे निसर्ग वादळाचा तडाखा बसून हानी होऊ नये, याचे नियोजन सरकार करत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.
निसर्ग वादळाचा सामना करण्यासाठी सरकारने तयारी केली आहे. चक्रीवादळाचा तडाखा ज्या परिसरात बसणार आहे, त्या परिसरातील नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासह मच्छिमार बांधवांना समुद्रात न जाण्याविषयी अलर्ट करण्यात आले आहे. चक्रीवादळाचा तडाखा मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांना बसणार आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाला अलर्ट करण्यात आले आहे. याविषयीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांना दिली आहे.
हेही वाचा - चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग - बाळासाहेब थोरात