ETV Bharat / city

महायुती अधांतरी; राणे वेटिंगवर, मुख्यमंत्री म्हणतात वाट पाहा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. अशातच भाजप पक्षात अनेक नेते प्रवेश करत आहेत. मात्र, खासदार नारायण राणे यांचा पक्ष प्रवेश सध्या होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 23, 2019, 3:46 PM IST

Updated : Sep 23, 2019, 7:15 PM IST

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतले घटक पक्ष आपला जाहीरनामा काढत असतानाच सत्ताधारी शिवसेना आणि भाजप युतीचे घोंगडे अजूनही भिजत पडले आहे. भाजप आणि शिवसेनेच्या युतीची मलाही काळजी आहे. लवकरच याबाबतचा योग्य निर्णय घेतला जाईल. तसेच खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा ही होईल, त्यासाठी थोडी वाट पाहा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची विधानसभेच्या जागावाटपाची बोलणी सुरू आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही एका फॉर्मुल्यावर दोन्ही पक्षांचे एकमत होताना दिसत नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या रविवारच्या मुंबई दौऱ्यादरम्यान ही बोलणी पुढे जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शाह यांनी मातोश्रीचे नावही घेतले नाही. युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी लवकरच युतीचा योग्य निर्णय घेतला जाईल. दोन्ही पक्षात ठरलेले फॉर्मुले सांगितले जातील, असे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत आपला रोख केवळ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच केलेल्या आर्थिक घोषणांवर होता. देशात बदललेल्या धोरणाचा महाराष्ट्राला लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - भाजप घटक पक्षांना विचारात घेत नाही, विनायक मेटेंचा आरोप

आरेच्या विरोधामागे काही लोकांचे वेगळे मनसुबे -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमध्ये केल्या जाणाऱ्या वृक्षतोडी संदर्भातही भाष्य केले. काही लोक खरेच वृक्ष तोड करू नये यासाठी झटत आहेत हे मान्य. पण काही लोकांचे मनसुबे वेगळे आहेत, त्याचा तपास करावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आरे मधल्या वृक्षतोडीबाबत सरकारने काही लोकांची मते मागवली होती. त्यावेळी आलेल्या १३ हजार पत्रांपैकी केवळ बंगळुरूच्या आयपी अड्रेसवरून आलेल्या पत्रांची संख्या दहा हजार होती, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आरे कारशेडबाबत वेगळा निर्णय घ्यायचा झाल्यास आगामी काळात त्याचा भुर्दंड लोकांनाच सहन करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. मेट्रोच्या प्रकल्पाला जितका उशीर होईल, तेवढाच या प्रकल्पाचा खर्च वाढेल असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - काळा चष्मा काढल्यानंतर त्यांना त्यांची काळी बाजू दिसायला लागली; अजित पवारांची पिचडांवर टीका

Intro:सूचना- या बातमीसाठी मोजो वरून जे live फीड आले आहे ते वापरता येईल . 

महायुती अधांतरी , राणे ही वेटिंगवर , मुख्यमंत्री म्हणतात वाट पहा 

मुंबई २३

महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजले असून  काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतले घटक  पक्ष आपला जाहीर नामा  काढत असतानाच सत्ताधारी शिवसेना आणि भाजप युती चे घोंगडे अजूनही भिजत पडले  आहे .  भाजप आणि शिवसेनेच्या युतीची मलाही काळजी असून लवकरच याबाबतचा योग्य निर्णय घेतला जाईल .तसेच खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा  ही  होईल , त्यासाठी थोडी वाट पहा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले . भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या  पत्रकार परिषदेत ते बोलत होते . 

भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची विधानसभेच्या जागावाटपाची बोलणी सुरु आहेत . मात्र अद्याप कोणत्याही एका फॉर्मुल्यावर दोन्ही पक्षांचे  एकमत होताना दिसत नाही . भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रविवारच्या मुंबई दौऱ्या दरम्यान ही  बोलणी पुढे जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती . मात्र शहा यांनी मातोश्री चे नाव ही घेतले नाही.  युती बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारना केली असता त्यांनी लवकरच युतीचा  योग्य निर्णय घेतला जाईल . दोन्ही पक्षात ठरलेले फॉर्मुले सांगितले जातील असे सांगितले .  मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत आपला रोख  केवळ  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच केलेल्या  आर्थिक घोषणांवर होता . देशात बदललेल्या धोरणाचा  महाराष्ट्राला लाभ होईल असेही त्यांनी सांगितले .  

आरेच्या विरोधामागे काही लोकांचे वेगळे मनसुबे - मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोच्या कारशेडसाठी आरे मध्ये  केल्या जाणाऱ्या वृक्षतोडी संदर्भात ही भाष्य केले . काही लोक खरंच वृक्ष तोड करू नये यासाठी झटत आहेत हे मान्य . पण काही लोकांचे मनसुबे वेगळे आहेत ,त्याचा तपस करावा लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले . आरे मधल्या  वृक्षतोडीबाबत सरकारने काही लोकांची मते मागवली होती . त्यावेळी आलेल्या १३ हजार पत्रांपैकी केवळ बंगळुरूच्या आयपी अड्डरेसवरून आलेल्या  पत्रांची संख्या दहा हजार होती,अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी  यावेळी दिली   . आरे कारशेड बाबत वेगळा निर्णय  घ्यायचा झाल्यास आगामी काळात त्याचा भुर्दंड लोकांनाच सहन करावा लागेल असेही त्यांनी सांगितले . मेट्रोच्या प्रकल्पाला जेव्हढा उशीर होईल ,तेव्हढाच या प्रकल्पाचा खर्च वाढेल असेही त्यांनी सांगितले . Body:...Conclusion:
Last Updated : Sep 23, 2019, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.