ETV Bharat / city

ED Chargesheet On Anil Deshmukh : अनिल देशमुख प्रकरणात ईडीकडून आरोपपत्र दाखल - Chargesheet filed ED In Anil Deshmukh Case

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या (Anil Deshmukh In ED Custody) अडचणीत वाढ झाली आहे. देशमुख प्रकरणात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आज ईडी कडून विशेष न्यायालयात अनिल देशमुख यांच्यासह पत्नी आणि मुलागा यांच्या विरोधातही ( Anil Deshmukh Judicial Custody ) सहआरोपी म्हणून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

अनिल देशमुख
अनिल देशमुख
author img

By

Published : Dec 29, 2021, 12:06 PM IST

Updated : Dec 29, 2021, 1:12 PM IST

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Chargesheet filed ED In Anil Deshmukh Case ) देशमुख प्रकरणात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आज ईडी कडून विशेष न्यायालयात अनिल देशमुख यांच्यासह पत्नी आणि मुलागा यांच्या विरोधातही सहआरोपी म्हणून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

ईडीकडून अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक

100 कोटी कथित वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीकडून अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. आज बुधवार (दि. 29)रोजी ईडीने विशेष PMLA कोर्टात अनिल देशमुख यांच्यासह मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांची पत्नीचा भाव (सली) याच्या विरोधात सहा आरोप असल्याचं 6000 हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हृषिकेश देशमुख आणि सलील यांचीही सहआरोपी म्हणून नावे

देशमुख प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई पीएमएलए कोर्टात आरोपपत्र सादर केले. आरोपपत्र 6000 पानांचे असून आरोपपत्रात देशमुख यांचे नाव आरोपी म्हणून ठेवण्यात आले आहे. या खटल्यात देशमुख यांचे नाव प्रमुख आरोपी म्हणून त्यांची मुले हृषिकेश आणि सलील यांचीही सहआरोपी म्हणून नावे आहेत.

2 नोव्हेंबरला ते अचानक ईडीसमोर आले

अनिल देशमुख हे नोव्हेंबर महिन्यापर्यंत तपास यंत्रणांच्या समोर आले नव्हते. 2 नोव्हेंबरला ते अचानक ईडीसमोर आले. ईडीने त्यांची सात तासांहून अधिक काळ चौकशी केली आणि त्यांना अटक केली. देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्याविरोधात ऑगस्ट महिन्यात पहिलं आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाझेचा जबाब दोनदा नोंदवला

मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून खंडणी गोळा करून बडतर्फ सहाय्यक निरीक्षक सचिन वाझेने अनिल देशमुखाना 4.7 कोटी रुपये दिल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना आढळले. या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाझेचा जबाब दोनदा नोंदवला. अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआय एफआयआरनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सचिन वाझे आणि इतर काही पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईत खंडणी म्हणून महिन्याला 100 कोटी रुपये उकळण्यास सांगितले होते. हा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. हा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केला होता. सचिन वाझे आणि इतर काही अधिकाऱ्यांना अनिल देशमुख यांनी दर महिन्याला बार आणि रेस्टराँटमधून शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं असं परमबीर यांनी म्हटलं होतं.

परिवहन मंत्री अनिल परब यांनीही ईडीकडे त्यांचे जबाब नोंदवला

ईडीने मुंबई आणि नागपुरात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. देशमुखांचे पीए आणि पीएस कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना जून महिन्यात ईडीने अटक केली होती. ईडी एसपी स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचारावरही नजर ठेवून आहे. या प्रकरणात 12 पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनीही ईडीकडे त्यांचे जबाब नोंदवला आणि माजी मुख्य सचिव सीताराम कुंटेस यांचेही याप्रकरणी जबाब नोंदवण्यात आला आहे.

29 नोव्हेंबरपर्यंत सुनावली होती कस्टडी -

ईडीकडून अनिल देशमुख यांना 100 कोटी वसुली प्रकरणात अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख यांना 15 दिवस 'ईडी' कस्टडीमध्येदेखील ठेवले होते. त्यानंतर आलेले देशमुख यांना 12 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने 29 नोव्हेंबरपर्यंत कस्टडीत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कस्टडी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 10 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला.

काय आहे प्रकरण? -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

हेही वाचा - Radhanagari Dam Kolhapur : राधानगरी धरणाचा दरवाजा उघडल्यानंतर अडकला; मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

Last Updated : Dec 29, 2021, 1:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.