ETV Bharat / city

चंद्रपुरात कायम राहणार दारूबंदी, धानोरकरांच्या मागणीला उत्पादन शुल्क मंत्र्यांची केराची टोपली - चंद्रपूर

चंद्रपूरच्या लोकप्रतिनिधींनी दारूबंदी मागे घेण्याची मागणी करू नये. जिल्ह्यात दारूबंदी कायम राहील, अशा शब्दात बावनकुळेंनी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या दारूबंदी उठवण्याच्या मागणीला प्रत्युत्तर दिले.

चंद्रशेखर बावनकुळे
author img

By

Published : May 30, 2019, 1:01 PM IST

मुंबई - ठराविक लोकांना खूश करण्यासाठी चंद्रपूरच्या खासदारांनी दारूबंदी मागे घेण्याची मागणी करू नये, असे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

चंद्रपूर आणि गडचिरोलीचा दारूबंदीचा निर्णय लोकभावना लक्षात घेऊन केला आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या लोकप्रतिनिधींनी दारूबंदी मागे घेण्याची मागणी करू नये. जिल्ह्यात दारूबंदी कायम राहील, अशा शब्दात बावनकुळेंनी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना प्रत्युत्तर दिले.

दारूबंदी ही स्थानिक जनभावना असून यात राजकारण नको, असे बावनकुळे म्हणाले. धानोरकर यांनी दारूबंदी उठवण्याची मागणी अधिकृतपणे केलेली नाही. त्यासाठी त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे. कोणत्या समाजघटकांचा त्यांनी अभ्यास केला हे माहीत नाही. दारूबंदीचा धोरणात्मक निर्णय विचाराअंती घेतला असून यात बदल होणार नाही. जिल्ह्यात दारूबंदी होती आणि पुढेही राहणार आहे. दारूबंदी ही स्थानिक जनभावना असून यात राजकारण नको, असे ही ते यावेळी म्हणाले.

काय आहे प्रकरण-

चंद्रपूरमध्ये दारूबंदी केल्यामुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळेही दारूबंदी हटवा, अशी मागणी महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकरांनी केली होती. एका जिल्हात दारूबंदी करुन काहीही साध्य होणार नाही. तुमच्या हातात महाराष्ट्राची आणि संपूर्ण देशाची सत्ता आहे त्यामुळे पूर्ण राज्यात दारूबंदी करायला हवी, असेही ते म्हणाले होते.
वणी विधानसभा मतदारसंघात बाळू धानोरकर यांचे दारुचे दुकान आहे. त्यामुळे त्याच्यावर लोकसभेच्या निवडणुकात टीका झाली होती. विरोधकांनी धानोरकरांना दारूवाला म्हणून हिणवत जनतेला दारूवाला पाहिजे का, दुधवाला असा प्रचार केला होता. मात्र, तरीही ते या निवडणुकीत विजयी झाले.

Intro:Body:MH_MUM_ExisePC_Chandrapur_Bawankule_7204684

ठराविक लोकांना खुश करण्यासाठी चंद्रपुरच्या खासदारांनी दारुबंदी मागे घेण्याची मागणी करु नये: उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावणुळेंची पत्रकार परीषदेत माहीती

मुंबई: चंद्रपुर आणि गडचिरेलीचा दारुबंदीचा निर्णय लोकभावना लक्षात घेऊन केला आहे. त्यामुळं चंद्रपुरच्या लोकप्रतिनिधींनी दारुबंदी मागे घेण्याची मागणी करु नये. चंद्रपुरात दारुबंदी कायम राहील, अशा शब्दात उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावणुळेंनी कॉंग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार धानोरकर यांना पत्रकार परीषदेत प्रत्युत्तर दिले आहे.

दारुबंदी ही स्थानिक जनभावना असून यात राजकारण नको असे बावणकुळे म्हणाले. ते म्हणाले, खा. धानोरकर यांनी दारुबंदी उठवण्याची मागणी अधिकृतपणे केलेली नाही. त्यासाठी त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे. कोणत्या समाजघटकचा त्यांनी अभ्यास केला हे माहीत नाही. दारुबंदीचा धोरणात्मक निर्णय विचाराअंती घेतला असून यात बदल होणार नाही. चंद्रपुरात दारुबंदी होती आणि राहणार.दारुबंदी ही स्थानिक जनभावना असून यात राजकारण नको असे बावणकुळे शेवटी म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.