ETV Bharat / city

मंदिरे बंद असल्याने रेल्वेला मोठा फटका; शिर्डीसह पंढपूरच्या विशेष गाड्या रद्द - railway loss due to COVI 19 situation in Maharashtra

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. या कडक निर्बंधात सर्वधर्मियांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थींसाठी बंद राहणार असल्याची नियमावली राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

central railway
केंद्रीय रेल्वे
author img

By

Published : Apr 8, 2021, 9:14 PM IST

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे साईनगर-दादर आणि शिर्डी-पंढरपूर या दोन गाड्या रेल्वे प्रशासनाने पुन्हा रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहेत. त्यामुळे रेल्वेला आर्थिक फटका सोसावा लागत आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. या कडक निर्बंधात सर्वधर्मियांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थींसाठी बंद राहणार असल्याची नियमावली राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीतील साई मंदीर, कार्तीक स्वामी आणि पुणतांबेतील चांगदेव महाराज मंदिसुद्धा दर्शनासाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने दादरहून साईनगर शिर्डी व पंढपूर विशेष गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा-पुण्यात कोरोना लसीचा तुटवडा; अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद

या गाड्या रद्द-

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01041/ 01042 दादर - साईनगर शिर्डी-दादर विशेष ट्रेन 10 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक 01027/ 01028 दादर - पंढरपूर-दादर विशेष ट्रेन 9 एप्रिल ते 1 मेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01403/ 01404 नागपूर - श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर- नागपूर विशेष ट्रेन 13 एप्रिल ते 27 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

रेल्वेचे लाखो रुपयांचे नुकसान-

गेल्या वर्षी टाळेबंदीच्या काळात राज्यभरातील मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता. त्यानंतर टाळेबंदी खुली करताना राज्य सरकारने पुन्हा मंदिरे खुले केले होते. त्यामुळे शिर्डीतील साई मंदीर, कार्तीक स्वामी आणि पुणतांबेतील चांगदेव महाराज मंदीर दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढली होती. तेव्हा प्रवासी भक्तांसाठी रेल्वेकडून साईनगर-दादर आणि दादर-पंढरपूर या दोन गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा दोन्ही गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे रेल्वेचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा-भाजप आज सुपात आहे, उद्या जात्यात असेल - मंत्री हसन मुश्रीफ

ब्रेक द चेन उपाययोजनेअंतर्गत 5 एप्रिलला निर्बंध आदेश जारी

कोविड -19 संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन उपाययोजनेअंतर्गत 5 एप्रिलला निर्बंध आदेश जारी केले आहेत. याअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही अटीसह सर्व प्रासंगिक सेवांसह सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये विमानतळावर आवश्यक मालमत्तेची हाताळणी, तिकिटिंग इत्यादी अनुषंगिक सेवांचा समावेश आहे.

परवानगी असलेल्या उत्पादनांच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सर्व अनुषंगिक कामांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच उत्पादन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या तसेच तयार झालेले उत्पादन पाठविण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे, कार्यालयीन प्रक्रियेलासुद्धा परवानगीचा समावेश यामध्ये आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.