ETV Bharat / city

Yes Bank case : सीबीआयची मुंबईसह पुण्यात छापेमारी - डीएचएफएल

येस बँक प्रकरणात ( Yes Bank Case ) आरोपी असलेल्या राणा कपूर ( Rana Kapoor ) आणि रेडियस डेव्हलपर्स डायरेक्टर संजय छाब्रिया ( Sanjay Chhabria ) यांचाशी संबंधित व्यक्तीच्या निवासस्थानावर मंगळवारी (दि. 15 फेब्रुवारी) सीबीआयने मुंबई आणि पुण्यामध्ये छापेमारी केली असून तपास सुरू आहे. एकूण 6 ठिकाणी छापेमारी झाल्याचे कळते. त्यामध्ये बिल्डर संजय छाब्रियाच्या रेडियस ग्रुपच्या मालमत्तांच्या ठिकाणीही छापेमारी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सीबीआय
सीबीआय
author img

By

Published : Feb 15, 2022, 4:12 PM IST

Updated : Feb 15, 2022, 4:25 PM IST

मुंबई - येस बँक प्रकरणात ( Yes Bank Case ) आरोपी असलेल्या राणा कपूर ( Rana Kapoor ) आणि रेडियस डेव्हलपर्स डायरेक्टर संजय छाब्रिया ( Sanjay Chhabria ) यांचाशी संबंधित व्यक्तीच्या निवासस्थानावर मंगळवारी (दि. 15 फेब्रुवारी) सीबीआयने मुंबई आणि पुण्यामध्ये छापेमारी केली असून तपास सुरू आहे. एकूण 6 ठिकाणी छापेमारी झाल्याचे कळते. त्यामध्ये बिल्डर संजय छाब्रियाच्या रेडियस ग्रुपच्या मालमत्तांच्या ठिकाणीही छापेमारी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

डीएचएफएलचे ( DHFL ) प्रमोटर कपिल आणि धीरज वाधवान ( kapil and dheeraj Wadhawan ) सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या केसेसमुळे सध्या कारागृहात आहेत. तर येस बॅंक घोटाळ्यातही राणा कपूरही तळोजा कारागृहात आहे. येस बॅंकेचा सहसंस्थापक असलेला राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबियांनी तब्बल 600 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा सीबीआयचा दावा आहे. डीएचएफएलच्या माध्यमातून 3 हजार 700 कोटी रुपयांच्या हाऊसिंग फायनान्स प्रकरणातील हा घोटाळा आहे.

रेडियस ग्रुपने मुंबई उपनगरात रिअल इस्टेटच्या विकास प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई उपनगरात डीएचएफएलच्या माध्यमातून 3 हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. रेडियस आणि समर ग्रुपमध्ये संयुक्त भागिदारीतून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पण, या प्रकरणात कर्जाचा वापर हा योग्य गोष्टीसाठी न झाल्याचे आढळले आहे. तर आणखी एका प्रकरणात ही रक्कम कुटुंबियांच्या नावे वळवण्यात आल्याचेही सीबीआयच्या तपासात निदर्शनास आले आहे.

हेही वाचा - Shivsena Press : 'झुकेंगे नही' शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी; पत्रकार परिषदेसाठी LED स्क्रीनची व्यवस्था

Last Updated : Feb 15, 2022, 4:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.