पुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. रमेश बागवे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच शिंदे यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले आहे. आता महापालिका निवडणूका त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.
Breaking Live Page : पुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड - महाराष्ट्र ठळक घडामोडी ७ जून
![Breaking Live Page : पुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड Breaking news live page 7 June 2022](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15492624-726-15492624-1654573020733.jpg?imwidth=3840)
20:47 June 07
पुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड
19:45 June 07
वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन
प्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे मुंबईत निधन झाले. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून ते गेली चाळीसहून अधिक वर्षे कार्यरत होते. भारदस्त आवाजासाठी ते ओळखले जायचे. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी सुजाता आणि एक मुलगा, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
19:41 June 07
ट्रायडेंटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल
ट्रायडेंटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत.
19:35 June 07
ट्रायडेंटमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दाखल
मुंबई- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ट्रायडेंटमध्ये पोहोचले आहेत. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे, एच. के. पाटील आणि शरद पवारदेखील दाखल झाले आहेत.
18:54 June 07
महाविकास आघाडी बैठकीसाठी आमदार आणि मंत्री ट्रायडेंट हॉटेलमध्ये येण्यास सुरुवात
मुंबई- मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री दिपक केसरकर, शिवसेना आमदार संजय गायकवाड, मंत्री राजेंद्र शिंगणे, उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, मंत्री राजेश टोपे, मंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेनेचे आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार हॉटेल ट्रायडेंटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हेदेखील पोहोचले आहेत.
18:01 June 07
पुणे टेरर फंडिंग प्रकरणात आरोपी जूनैद मोहम्मदला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
पुणे- पुणे टेरर फंडिंग प्रकरण आरोपी जूनैद मोहम्मदला आज न्यायलायात हजर करण्यात आले. यावेळी जुनैद याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 1 जूनला मोहम्मद याची एटीएस कोठडी 7 जूनपर्यंत वाढविण्यात आली होती.
17:42 June 07
अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या मतदान करण्याकरिता मागितलेल्या परवानगीवर ईडीकडून उत्तर दाखल
मुंबई- अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या मतदान करण्याकरिता मागितलेल्या परवानगीवर ईडीकडून उत्तर दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या कडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात 4 जून रोजी अर्ज केला होता
16:47 June 07
केतकी चितळेच्या जामीन अर्जावर 16 जून रोजी होणार निर्णय...
केतकी चितळे हिच्यावर नवी मुंबई येथे दाखल असलेल्या ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील जामीन अर्जावर आज ठाणे न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीश भागवत यांच्या कोर्टात युक्तीवाद करण्यात आला, केतकीच्या जामीन अर्जावर 16 जून रोजी निर्णय होणार आहे.
16:14 June 07
बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या ८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.
15:33 June 07
३३ वर्षीय व्यक्तीचा पत्नी आणि सासूवर गोळीबार
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील पीडब्ल्यूडी विभागाच्या आवारात ३३ वर्षीय व्यक्तीने आज पत्नी आणि सासूवर गोळीबार केला. त्या व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाला तर सासूला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गोळीबार करणारा व्यक्ती आणि त्याच्या भावाला पकडले आहे.
15:10 June 07
सचिन वाझेचा विशेष सीबीआय कोर्टात जामिनासाठी अर्ज
![Sachin Waze](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-7210567-sachinwazefilesbailapplicationinspecialcbicourt_07062022144036_0706f_1654593036_564.jpeg)
100 कोटी कथित वसुली प्रकरणात सचिन वाझे तर्फे विशेष सीबीआय कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. वाझेच्या जामिन अर्जावर 20 जूनला सुनावणी होणार आहे. या प्रकरणात वाझे माफीचा साक्षीदार झाला आहे.
14:01 June 07
आमदारांना रिट्रीट हॉटेलमधून ट्रायडंट हॉटेलमध्ये नेण्यात येणार
मुंबई - राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतील द रिट्रीट हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी हलवण्यात आले होते. त्यानंतर आज दुपारी तीन सुमारास शिवसेनेच्या सर्व आमदारांना रिट्रीट हॉटेलमधून ट्रायडंट हॉटेलमध्ये नेण्यात येणार आहे.
13:28 June 07
मुंब्रा पोलिसांचे नुपूर शर्मा यांना चौकशीसाठी समन्स
ठाणे - मुंब्रा पोलिसांनी नुपूर शर्मा यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अपशब्द काढल्याने त्यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10:42 June 07
विधानपरिषदेसाठी सचिन आहिर व नंदुरबारचे आमशा पाडवी यांची नावे जवळपास निश्चित
मुंबई - शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी सचिन आहिर व नंदुरबारचे आमशा पाडवी यांची नावे जवळपास निश्चित.
09:27 June 07
इसापूर येथे विवाह समारभांत लग्नाच्या अन्नातून शंभराहून अधिक लोकांना विषबाधा
यवतमाळ - पुसद तालुक्यातील इसापूर येथे विवाह समारभांत लग्नाच्या अन्नातून शंभराहून अधिक लोकांना विषबाधा झाली. यात काही लहान मुले गंभीर असल्याची माहिती मिळाली. काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास लग्न समारंभासाठी आलेल्या मंडळीनी जेवण केले. जेवनानंतर काही जणांना मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी शेंबाळपिंपरी येथील खाजगी रुग्णालयाची वाट धरली. मात्र तद्नंतर अनेकांना हा त्रास जाणवु लागल्याने शेंबाळपिंपरी येथील चंदेल रूग्णालयासह ईतर रूग्णालयात शंभराहूनच्या वर रूग्ण दाखल करण्यात आले. यात महिलांचाही समावेश होता.
09:10 June 07
गोव्यात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक
पणजी - उत्तर गोव्यातील अरंबोल येथील स्वीट वॉटर लेकजवळ 6 जून रोजी एका ब्रिटीश महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीला सध्या पोलिस लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
09:04 June 07
Breaking news live page 7 June 2022, पुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड
मुंबई - मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री दिपक केसरकर, शिवसेना आमदार संजय गायकवाड, मंत्री राजेंद्र शिंगणे, उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, मंत्री राजेश टोपे, मंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेनेचे आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार हॉटेल ट्रायडेंटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. ट्रायडेंटमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दाखल झाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री मल्लिकार्जून खर्गेदेखील दाखल झाले आहेत.
पीएनबी मनी लाँड्रिंग प्रकरणात फरार ज्वेल व्यावसायिक मेहुल चोक्सी, त्याची पत्नी प्रिती चोक्सी आणि इतरांविरुद्ध फिर्यादी तक्रार आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीने दावा केला आहे की प्रीती मुख्य लाभार्थी असून 2017 पासून अँटिग्वामध्ये तिच्या पतीसोबत लपून बसली होती. चोक्सी, त्याची पत्नी आणि त्यांच्या कंपन्यांसह सहा जणांविरुद्ध मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेले हे दुसरे पुरवणी आरोपपत्र आहे. 13,500 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणात सीबीआय आणि ईडीला भारतात हवा असलेला चोक्सी गेल्यावर्षी 23 मे रोजी बेपत्ता झाला होता.