मुंबई- एनसीबीने कारवायांचा धडाका सुरुच ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये एनसीबीने मुंबईसह परिसरात 6 छापे टाकले आहेत. हे छापे नवी मुंबई, दक्षिण मुंबई, नालासोपारा, आंतरराष्ट्रीय विमानतळ, वांद्रा आणि जुहू भागात टाकण्यात आले आहेत. हे छापे क्रूझ ड्रगच्या संबंधात टाकण्यात आल्याचे सूत्राने सांगितले.
Breaking News - समीर वानखेडे कायदेशीर कारवाई करू शकतात, मलादेखील कायदेशीर मार्ग निवडण्याचा अधिकार-नवाब मलिक - ब्रेकिंग न्यूज
21:15 October 21
क्रूझ ड्रग प्रकरण: गेल्या दोन दिवसांत एनसीबीने मुंबईसह परिसरात 6 ठिकाणी टाकले छापे
21:10 October 21
समीर वानखेडे कायदेशीर कारवाई करू शकतात, मलादेखील कायदेशीर मार्ग निवडण्याचा अधिकार-नवाब मलिक
मुंबई- एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यात वाद सुरू आहे. समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की देशात कायदा आहे. निश्चितच ते कायदेशीर कारवाई करू शकतात. ते कायदेशीर मार्ग निवडण्यासाठी स्वतंत्र आहे. मलादेखील कायदेशीर मार्ग निवडण्याचा अधिकार आहे. योग्य फोरममध्ये ते मांडणार आहे. ते भविष्यात नक्कीच घडणार असल्याचा सूचक इशाराही मलिक यांनी वानखेडे यांना दिला आहे.
20:07 October 21
नवाब मलिक यांनी ट्विट केलेले फोटो दुबईमधील नव्हे मुंबईमधील आहेत- समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर
मुंबई - राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना तुरुंगावासात पाठवू असा इशारा दिला होता. तसेच काही आरोपही केले होते. याला समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक यांनी दावा केल्याप्रमाणे आपण दुबईमध्ये गेलो नव्हतो. ते फोटो मुंबईमधील आहेत. त्यांनी चुकीचे दावे केले आहेत. वरिष्ठांची परवानगी घेऊन नवाब मलिक यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
18:38 October 21
अनन्या पांडे एनसीबीच्या कार्यालयातून पडली बाहेर; ड्रग्ज प्रकरणात दोन तास झाली चौकशी
मुंबई - बॉलीवुड अभिनेत्री ही एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडली आहे. एनसीबीने अनन्या पांडेला (21 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे ती पिता अभिनेता चंकी पांडेसह एनसीबी कार्यालयात उपस्थित राहिली. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडे यांच्या घरी पोहोचले होते.
17:05 October 21
आर्यन खानच्या कोठडीत वाढ, 30 ऑक्टोबरपर्यंत राहणार न्यायालयात कोठडीत मुक्काम
मुंबई- क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. आर्यन खान हा गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे आर्यनला 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. आर्यन हा बॉलीवुड अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आहे. एनसीबीची टीम शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यावर गुरुवारी दाखल झाली होती.
16:08 October 21
दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी; केंद्राकडून महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
नवी दिल्ली - केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 जुलै 2021 पासून वाढ होणार आहे. त्याचा फायदा पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही होणार आहे.
15:41 October 21
अभिनेत्री अनन्या पांडे घरातून पडली बाहेर, एनसीबीच्या कार्यालयात होणार हजर
मुंबई -अभिनेत्री अनन्या पांडे ही एनसीबीच्या कार्यालयात जाण्यासाठी तिच्या घरातून बाहेर पडली आहे. एनसीबीने चौकशीसाठी तिला आज दुपारी 2 वाजता हजर राहण्याचे समन्स पाठविले आहे. र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडे यांच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घराचीही झडती घेतली. असे बोलले जाते आहे की, ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यन खानच्या ड्रग्स चॅटमध्ये बोलले जात होते, ती अनन्या पांडे होती. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही. सध्या एनसीबीने अनन्या पांडेला (21 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.
15:00 October 21
वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये; नितीन गडकरींचा जबर टोला
नागपूर - विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आपण महाराष्ट्राचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना मी कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये, असा टोला केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे. फडणवीस यांच्या विरोधात गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काही तरी सांगितले, असे जे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे.
13:29 October 21
अहमदनगर ब्रेकिंग - १६ वर्षीय शाळकरी मुलीचा संशयास्पद मृतदेह घरात आढळून आल्याने खळबळ
अहमदनगर ब्रेकिंग - १६ वर्षीय शाळकरी मुलीचा संशयास्पद मृतदेह घरात आढळून आल्याने खळबळ. मृत्यूचे कारण अस्पष्ट. पारनेर तालुक्यातील जवळे गावातील बरशीले वस्तीवर वरील घटना. अत्याचार करून हत्या केल्याचा नातेवाईकांसह ग्रामस्थांचा आरोप. यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. घटनेच्या निषेधार्थ आज जवळे गाव बंद ठेवून केला निषेध व्यक्त. शवविच्छेदनासाठी मृतदेह नगरच्या जिल्हा रुग्णालयात केला दाखल. अहवालानंतर मृत्यूचे कारण होणार स्पष्ट
12:36 October 21
Breaking News - अभिनेता शाहरुख खानच्या घरी एनसीबीच्या पथकाची धाड
Breaking News - अंधेरीत सुप्रसिद्ध अभिनेत्रिच्या घरी एनसीबीची छापेमारी
Breaking News - NCB raids the house of a well-known actress in Andheri
Breaking News - NCB squad raids actor Shah Rukh Khan's house
12:15 October 21
एकनाथ खडसेंना आठवड्याभरासाठी मुंबई हायकोर्टाचा दिलासा
पुणे कथित जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना आठवड्याभरासाठी मुंबई हायकोर्टाचा दिलासा
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी तूर्तास अटक न करण्याचे हायकोर्टाचा ईडीला निर्देश
खडसेंना नियमित जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात दाद मागण्याची दिली गेली आहे मुभा
सदर प्रकरणात मुंबई सत्र न्यायलयात विशेष ईडी कोर्टात सुरू आहे प्रकरण
10:50 October 21
नागपूर - पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाची हत्या
शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाची हत्या
गोल्डी शंभरकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव
पोलीस घटनास्थळी दाखल,तपास सुरू
10:42 October 21
मुंबई उच्च न्यायालयात 26 ऑक्टोबरला आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
मुंबई उच्च न्यायालय 26 ऑक्टोबर रोजी आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणार आहे
09:55 October 21
देशात १०० कोटी कोरोना लसिकरण पूर्ण
भारताने रचला इतिहास. देशात १०० कोटी कोरोना लसिकरण पूर्ण. आज सकाळीच कोरोनाचे १०० कोटीचे लसिकरण पूर्ण
09:18 October 21
आर्यनच्या भेटीला पिता शाहरुख खान आर्थररोड जेलमध्ये
आर्यनच्या भेटीला पिता शाहरुख खान आर्थररोड जेलमध्ये. कोठडीत असलेल्या आर्यनची शाहरुख भेट घेणार
08:58 October 21
शिक्षिकेने मारहाण केल्याने शाळेतील 7 वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
राजस्थान - चुरू जिल्ह्यातील एका शिक्षिकेने मारहाण केल्याने एका खाजगी शाळेतील 7 वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला
08:01 October 21
2.50 लाख रुपये किमतीचे गोमांस घेऊन जाणारा टेम्पो ठाण्यात जप्त
2.50 लाख रुपये किमतीचे गोमांस घेऊन जाणारा टेम्पो काल ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला. एकाला अटक आणि गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू आहे: ठाणे पोलीस
07:33 October 21
Breaking News - समीर वानखेडे कायदेशीर कारवाई करू शकतात, मलादेखील कायदेशीर मार्ग निवडण्याचा अधिकार-नवाब मलिक
Breaking News - कोथिंबीर पाचशे रुपये किलो झाली पाहिजे -बच्चू कडू
अमरावती - पावसामुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. त्यात पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मागील काही दिवसात भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यात भाजीला स्वाद आणणारी कोथिंबीर ही 200 रुपये किलो पर्यंत गेली आहे. परंतु, कोथिंबीरचे भाव 200 नाही तर 500 रुपये कीलोपेक्षाही जास्त झाले पाहिजे अशी इच्छा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाचा भाव वाढला तर अनेकांच्या पोटामध्ये दुखू लागत असे बच्चू कडू म्हणाले. गोरगरीब लोकांना वाढलेल्या किमतीमध्ये भाजीपाला घेणे शक्य होत नाही. तर, त्यामुळे शासनाने स्वस्त धान्य दुकानातून देखील भाजीपाल्याच वाटप केलं पाहिजे अशी मागणीही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.