ETV Bharat / city

BMC Action On Shop : मराठी पाट्यांकडे दुर्लक्ष, पाच लाख दुकानदार पालिकेच्या रडारवर - Display Marathi Boards

दुकाने आणि आस्थापनांची नावे मराठीत ( Display Marathi Boards ) असावीत असा निर्णय राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने घेतला ( BMC will take action against shops ) आहे. या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जाणार आहे. यामुळे मुंबईमधील तब्बल पाच लाख दुकानदार पालिकेच्या रडारवर आले आहेत.

BMC Action On Shop
मुंबई महानगर पालिका
author img

By

Published : Apr 28, 2022, 2:54 PM IST

मुंबई - दुकाने आणि आस्थापनांची नावे मराठीत ( Display Marathi Boards ) असावीत असा निर्णय राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने घेतला ( BMC will take action against shops ) आहे. या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जाणार आहे. यामुळे मुंबईमधील तब्बल पाच लाख दुकानदार पालिकेच्या रडारवर आले आहेत.

मराठी पाट्या बंधनकारक - देशाची आर्थिक राजधानी आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबईत सर्वभाषिक नागरिक राहत असून परदेशी पर्यटकही येत असतात. यामुळे बहुतेक दुकाने आणि आस्थापनांची नावे विशेष करून इंग्रजी भाषेत लिहिली जात होती. याविरोधात राजकीय पक्षांनी मराठीत नावे करण्याची मागणी केली. त्यावर राज्य सरकाराने सर्व दुकाने आणि आस्थापनांची नावे मराठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर कारवाई - दुकानांना मराठी पाट्या लावणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबईमधील पाच लाखाहून अधिक दुकानांची पाहणी केली जाणार आहे. सुरुवातीला मराठी पाट्यांसह नियमांचे पालन करा अशी जनजागृती केली जाणार आहे. मुंबईमधील व्यापारी संघटनांशीही चर्चा केली जाणार आहे. त्यानंतरही मराठी पाट्या लावल्या नाही तर त्या दुकानदाराविरोधात न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा - Strict Rules for Marathi Boards : राज्य सरकारचे मोठे पाऊल; मराठी पाट्या सक्तीसाठी कठोर नियमावली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.