मुंबई - सरकारने मिशन बिगीन अगेन असे म्हणत जनजीवन पुन्हा सुरळीत करायचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधित गाईडलाईन महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी लॉकडाऊन विस्ताराच्या सुधारित गाईडलाईनमध्ये दुरुस्ती केली आहे. एकंदरीतच मुंबई पालिकेने मिशन बिगीन अगेन यशस्वी करण्यासाठी कंबर कसली असल्याचे पाहायला मिळत आहे.
या सुधारणांनुसार, सर्व बाजारपेठा आणि दुकानांना सोमवार ते शनिवार या कालावधीत संपूर्ण मार्केट कॉम्प्लेक्स व मॉल वगळता कामकाजाची परवानगी आहे. मात्र, रस्त्याच्या एका बाजूला असलेली सर्व दुकाने आणि बाजारपेठा एका दिवशी उघडतील, तर दुसर्या बाजूची दुकाने दुसर्या दिवशी उघडतील, असे परिपत्रकात नमूद केले आहे.
यासह खासगी कार्यालयांना कार्यालयात कार्यरत कार्यक्षमतेच्या 10 टक्के कार्य करण्याची परवानगी असताना, वर्तमानपत्रांचे मुद्रण आणि वितरण देखील करण्यास परवानगी दिली आहे. महापालिकेच्या या गाईडलाईन्सचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी महापालिका कर्मचारी मुंबईतील बाजारपेठांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना आणि दुकानदारांना नवीन सूचनांबद्दल माहिती देत आहेत. त्या सूचनांचे पालन करण्यासाठी दुकानदारांना आव्हानही ते करताना दिसत आहेत. मुंबईतील फोर्ट भागात महापालिका कर्मचारी आज मार्केटमध्ये फिरताना आणि दुकांदारांचे प्रबोधन करताना पाहायला मिळाले.