ETV Bharat / city

Marathi Signboards : मराठी पाट्या न लावणाऱ्या ५२२ दुकानदारांना पालिकेची नोटिस - दुकानांवर मराठी पाट्या

मुंबईमधील दुकानांवर मराठी पाट्या लावणे सरकार आणि पालिकेने बंधनकारक केले आहे. त्या नंतरही बहुसंख्य दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या नसल्याने सोमवार १० ऑक्टोबरपासून पालिकेने तपासणी सुरु केली आहे. पहिल्याच दिवशी २१५८ ठिकाणी केलेल्या तपासणीत १६३६ दुकानांनी मराठी पाट्यांची अंमलबजावणी केली आहे.

shopkeepers
shopkeepers
author img

By

Published : Oct 11, 2022, 7:52 PM IST

मुंबई - मुंबईमधील दुकानांवर मराठी पाट्या लावणे सरकार आणि पालिकेने बंधनकारक केले आहे. त्या नंतरही बहुसंख्य दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या नसल्याने सोमवार १० ऑक्टोबरपासून पालिकेने तपासणी सुरु केली आहे. पहिल्याच दिवशी २१५८ ठिकाणी केलेल्या तपासणीत १६३६ दुकानांनी मराठी पाट्यांची अंमलबजावणी केली आहे. तर अजूनही यापैकी ५२२ दुकानदारांनी मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळले असून संबंधितांना नोटिस देण्यात आली आहे. पुढील सात दिवसांत अंमलबजावणी न केल्यास नियमानुसार कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

बहुसंख्या दुकानांवर मराठी पाट्याच नाहीत - मुंबईत सुमारे ५ लाख दुकाने आहेत. मराठी पाट्या लावण्यासाठी पालिकेने ३१ मे, ३० जून व ३० सप्टेंबर अशी तीन वेळा डेडलाईन दिली होती. या कालावधीत २ लाख दुकानांचा सर्व्हे करण्यात आला. त्यापैकी केवळ १ लाख दुकानांनी मराठी पाट्या लावल्या होत्या. सर्व्हे केल्या प्रमाणे २ लाखांपैकी १ लाख म्हणजे ५० टक्के दुकानांनी मराठी पाट्या लावल्या आहेत. ३ ऑक्टोबरपासून वॉर्डनिहाय तपासणी करून दुकानांवर मराठी पाट्या न दिसल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल असे सांगण्यात आले होते. पालिकेत ३ आणि ४ ऑक्टोबरला पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यानंतर बुधवारी ५ ऑक्टोबराला दसरा असल्याने कारवाई करण्यात आली नव्हती. या दरम्यान कोणती कारवाई करावी याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला नव्हता. १० ऑक्टोबरपासून कारवाई करू असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार पालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे.

काय आहे नियम - २०१८ च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक होते. मात्र, नव्या नियमानुसार कर्मचार्‍यांची संख्या विचारात न घेता मराठी भाषेतच फलक असणे बंधनकारक केले आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनास कलम ७ नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. मात्र, यापूर्वी तीन वेळा मुदत वाढ देऊनही अनेक दुकानांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पालिकेचे पथक मुंबईभर दुकानांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करणार आहे. त्यासाठी पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या ७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम तयार आहे. मुंबई पालिकेच्या सर्व २४ विभागात होणार्‍या कारवाईत दुकानांवर मराठी पाटी नसल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तीन वेळा मुदतवाढ - राज्य सरकारच्या आदेशानंतर मुंबईतील दुकाने व आस्थापनांना मराठी पाट्या बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानांवर मराठी पाट्या ठळकपणे दिसतील अशा प्रकारे लावण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने दुकानदारांना ३१ मे ची डेडलाईन दिली होती. व्यापारी संघटनांकडून अंमलबजावणीसाठी मुदतवाढीची मागणी लावून धरण्यात आली होती. मराठी पाट्यांसाठी कलाकार उपलब्ध नसणे, मटेरिअल महागले आहे असे सांगत अंमलबजावणीला दिरंगाई होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी ३० जून पर्यंत मुदत वाढ दिली होती. त्यानंतरही व्यापाऱ्यांनी मराठी पाट्या न लावता सहा महिन्याची मुदत वाढ मागितली. त्यावर आयुक्तांनी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.