ETV Bharat / city

विशेष - जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी बीएमसीकडून 'अशी' सुरू आहे तयारी

राज्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. यावर्षी फेब्रुवारीमध्ये पहिली लाट आटोक्यात येत असतानाच राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली. राज्यात दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली असली तरी सध्या जे रुग्ण आढळून येत आहेत, त्यापैकी 80 टक्के रुग्ण हे डेल्टा या विषाणूचे आढळून येत आहेत.

जीनोम सिक्वेन्सिंग
जीनोम सिक्वेन्सिंग
author img

By

Published : Aug 17, 2021, 5:53 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार गेले दीड वर्ष आहे. या कालावधीत विषाणू बदलल्याने दोन लाटा आल्या. या दोन्ही लाटांचा प्रसार कमी झाला असताना राज्यात डेल्टा प्लस या कोरोनाच्या बदललेल्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत. विषाणूमध्ये झालेल्या बदलाचे आणि त्याचा प्रसार किती झाला याची माहिती त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी पालिकेने जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा - मुंबईत आता जिनोम सिक्वेन्सिंग लॅब; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोरोना ते डेल्टा प्लस

राज्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. यावर्षी फेब्रुवारीमध्ये पहिली लाट आटोक्यात येत असतानाच राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली. राज्यात दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली असली तरी सध्या जे रुग्ण आढळून येत आहेत, त्यापैकी 80 टक्के रुग्ण हे डेल्टा या विषाणूचे आढळून येत आहेत. कोरोनाच्या डेल्टा या विषाणूमुळे राज्यात आणि देशात दुसरी लाट आली. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक होती. राज्यात दुसरी लाट आटोक्यात येत असताना डेल्टा प्लस या बदल झालेल्या विषाणूचे राज्यात 76 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे ज्यांनी लसीचे एक आणि दोन डोस घेतले आहेत, अशा तब्बल 22 जणांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे.

जीनोम सिक्वेन्सिंग
जीनोम सिक्वेन्सिंग

जिनोमिक सिक्वेन्सिंग

गेल्या दीड वर्षात कोरोना विषाणूने डेल्टा आणि डेल्टा प्लस हे रूप धारण केले आहेत. या विषाणूचे रुग्ण किती आहेत. याचा प्रसार किती झाला आहे याची माहिती जिनोमिक सिक्वेन्सिंग या चाचण्यांमधून समोर येते. या चाचण्या पुण्याच्या एनआयव्ही या प्रयोगशाळेत केल्या जातात. देशात ही एकमेव प्रयोगशाळा आहे. याठिकाणी देशभरातून नमुने तपासणीसाठी येत असल्याने चाचण्यांचा रिपोर्ट मिळण्यास दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो. या कालावधीत संबंधित रुग्ण बरा होऊन घरी गेला असतो किंवा त्याचा मृत्यू झालेला असतो. रिपोर्ट उशिरा आल्याने आरोग्य विभागाला कोणत्याही उपाययोजना करता येत नाहीत. यामुळे मुंबई महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयात जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

सॅम्पल गोळा करणे सुरू

जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचण्या करण्यासाठी पालिकेने 6 कोटी रुपयांचे यंत्र विकत घेतले आहे. या यंत्राद्वारे चाचण्या करण्यासाठी सुमारे 380 सॅम्पल लागणार आहेत. ज्या इमारतींमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, जे रुग्ण रुग्णालयात महिनाभराहून अधिक काळ उपचार घेत आहेत, ज्या रुग्णांना लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे, अशा नागरिकांचे सॅम्पल गोळा केले जात आहेत. हे सॅम्पल गोळा केले की त्याच्या जिनोमिक चाचण्या केल्या जातील. जे रिपोर्ट आले आहेत ते योग्य आहेत का ते पुण्याच्या एनआयव्हीकडून तपासणी करून बरोबर आहेत का ते तपासले जाईल. रिपोर्ट बरोबर असल्यास पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

हेही वाचा - लसीच्या दोन डोसनंतर दिल्लीतील डॉक्टरला ३ वेळा कोरोना; मुंबईतील डॉक्टरांच्या अभ्यासातून उघड

कस्तुरबा रुग्णालयात लॅब

पुण्याच्या एनआयव्हीकडून अहवाल येण्यास उशीर होत असल्याने पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोमिक सिक्वेन्सिंग करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू केली आहे. याआधी याच प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. त्यात आता जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जातील. असे केल्याने दीड ते दोन महिने अहवाल येण्यास लागणारा कालावधी कमी होऊन तीन दिवसात अहवाल येईल. तीन दिवसात अहवाल आल्याने त्वरित उपचार करणे आणि उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

काय आहे जिनोमिक सिक्वेन्सिंग?

मुंबईत जे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत, त्यापैकी विविध विभागातील ५० रुग्णांचे सॅम्पल पुण्याच्या नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूटकडे जिनोमिक सिक्वेन्ससाठी पाठवले जातात. या सॅम्पलचा अहवाल एक ते दीड महिन्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला पाठवला जातो. या चाचणीच्या अहवालामधून विषाणूमध्ये बदल झाला आहे का, म्हणजेच त्याचे म्युटेशन झाले आहे का याची माहिती तसेच रुग्णाला कोणत्या प्रकारच्या कोरोनाची लागण झाली आहे. शहरात ही लागण इतरही रुग्णांना झाली आहे का याची माहिती मिळते त्यावरून उपाययोजना करण्यात येतात.

रिपोर्टसाठी एक दे दीड महिन्याचा कालावधी

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी दर आठवड्याला ५० रुग्णांचे सॅम्पल जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजेच एनआयव्हीकडे पाठवले जातात. यामधून त्या जिल्ह्यात किंवा त्या शहरात कोणत्या प्रकारच्या विषाणूचे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत, याची माहिती समोर येते. हा रिपोर्ट सुमारे एक ते दीड महिन्यांनी संबंधित सरकारी यंत्रणांना सादर केला जातो. हा रिपोर्ट राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही सादर केला जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.