ETV Bharat / city

मेट्रोसाठी पुन्हा ५०८ झाडे तोडण्याचा प्रस्ताव; सेनेच्या भूमिकेकडे मुंबईकरांचे लक्ष - mumbai metro

मेट्रो प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या तब्बल 508 झाडे तोडण्याची मागणी करण्यात आली आहे. ही झाडे तोडण्यासाठीचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे सादर करण्यात आला आहे.

mumbai metro car shed
मेट्रो प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या तब्बल 508 झाडे तोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
author img

By

Published : Feb 12, 2020, 9:40 PM IST

Updated : Feb 12, 2020, 10:41 PM IST

मुंबई - मेट्रो प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या तब्बल 508 झाडे तोडण्याची मागणी करण्यात आली आहे. ही झाडे तोडण्यासाठीचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे सादर करण्यात आला आहे. या आधीही कारशेडसाठी आरेमधील 2200 झाडे तोडल्याने त्याचे पडसाद सर्वत्र उमटले होते.

आता या प्रस्तावावर सत्ताधारी शिवसेना काय भूमिका घेते याकडे वृक्षप्रेमींचे लक्ष लागले आहे.

भाजप-शिवसेना युतीच्या काळात आरे येथील मेट्रो कारशेडसाठी झाडे कापण्यावरून जोरदार वाद रंगला होता. त्यावेळी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह विरोधक आणि वृक्षप्रेमी संस्था आक्रमक झाल्या. काही संस्थांनी निदर्शनेही केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर झाडे कापण्यास स्थगिती देण्यात आली. आता पुन्हा मेट्रो प्रकल्पासाठी 508 झाडे हटवण्याचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. यामध्ये 162 झाडे मुळापासून कापली जाणार आहे. तर 364 झाडे पुनर्रोपणाच्या नावाखाली हटवण्यात येणार आहेत.

वृक्ष प्राधिकरण समिती मधील इतर सदस्यांनी वृक्ष तोडीच्या बाजूने मतदान केल्याने हा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यामुळे 2200 झाडे तोडण्यास मंजुरी मिळाली होती. आता पुन्हा मेट्रोसाठी झाडे तोडण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिले असून शिवसेना कायम वृक्षतोडीचा विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'या' मार्गांवर होणार वृक्षतोड

अंधेरी डी.एन.नगर ते ओशिवरा नाला मेट्रो 2 साठी 32 झाडे कापावी लागणार आहेत. तर, 90 झाडे पुनर्रोपीत करावी लागणार आहे.

गोरेगाव आणि बांगूरनगर मार्गात स्टेशनच्या बांधकामात येणारी 29 झाडे कापावी लागणार आहेत. तर, 85 झाडे पुनर्रोपीत करावी लागणार.

कांदिवली पश्चिम भागातील लालजीपाडा ते महावीरनगर दरम्यान 53 झाडे कापावी लागणार आहेत. तर, 21 झाडे पुनर्रोपीत केली जाणार आहेत.

दहिसर पूर्व ते डी.एन.नगर दरम्यानची 64 झाडे कापण्यात येणार आहेत. तर, 37 झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत.

लिंक रोड ते चारकोप कारशेड डेपो मार्गात 11 झाडे कापावी लागणार आहेत. तर, 86 झाडे पुनर्रोपीत करावी लागणार आहेत.

Last Updated : Feb 12, 2020, 10:41 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.