ETV Bharat / city

स्मशानातील सोनं...! मृत्यूच्या नोंदी घेणाऱ्या कर्मचाऱ्याने मिळवली विधी शाखेची पदवी

author img

By

Published : Feb 10, 2020, 7:41 PM IST

Updated : Feb 10, 2020, 8:12 PM IST

शिक्षणाला वय नसते, हे महानगरपालिका कर्मचारी जगदीश नगरकर यांनी दाखवून दिले आहे. स्मशानभूमीत मृत्यू नोंदणी कारकून म्हणून काम करत त्यांनी वयाच्या 49 व्या वर्षी एलएलबी पदवी संपादन केली आहे.

BMC employee news
शानभूमीत मृत्यू नोंदणी कारकून म्हणून काम करत वयाच्या 49 व्या वर्षी एलएलबी पदवी संपादन केली आहे.

मुंबई - शिक्षणाला वय नसते, हे महानगरपालिका कर्मचारी जगदीश नगरकर यांनी दाखवून दिले आहे. स्मशानभूमीत मृत्यू नोंदणी कारकून म्हणून काम करत त्यांनी वयाच्या 49 व्या वर्षी पदवी मिळवली आहे. जिद्दीच्या जोरावर त्यांनी एलएलबी संपादन करण्याचा मान मिळवला आहे. अमाप कष्ट, लहानपणीच वडिलांचे हरवलेले छत्र, झोपडपट्टीत आयुष्य घालवणं या परिस्थितीत देखील त्यांची शिक्षणाची आवड कायम राहिली आहे. यामुळेच ते यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्याचे सांगतात.

शानभूमीत मृत्यू नोंदणी कारकून म्हणून काम करत वयाच्या 49 व्या वर्षी एलएलबी पदवी संपादन केली आहे.

1989 साली नगरकर पालिकेत हंगामी पद्धतीवर कामाला लागले. यानंतर त्यांची चतुर्थी श्रेणी कामगारांमध्ये निवड झाली. कुटुंबाचे ओझे अंगावर असतानाही त्यांनी वाणिज्य शाखेतून 2005 साली पदवी संपादन केली. यानंतर 2014 साली त्यांनी विधी शाखेत प्रवेश घेतला. त्यावेळी ते भोईवाडा स्मशानभूमीत काम करत होते. या स्मशानभूमीत त्यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यासाला पोषक असणारी शांतता स्मशानभूमी व्यतिरिक्त कुठेच मिळत नसल्याचे ते सांगतात.

2019 साली त्यांनी विधी शाखेत पदवी मिळवली व पालिकेच्या विधी शाखेत बदली मिळण्यासाठी अर्ज केला. हा अर्ज मान्य करत त्यांना नोटीस कारकून या पदावर घेण्यात आले. पुढे आणकी शिकायचं असून चतुर्थश्रेणी कामगारांना देखील शिकवायचे असल्याचे नगरकर यांनी सांगितले आहे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर मी चाललो; आणि इथपर्यंत पोहचलो, असे ते म्हणाले. बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाच्या मंत्राने हे शिक्षण पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढे आणखी शिकण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

Intro:मुंबई ।

शिक्षणाला वय नसते हे मुंबई महानगरपालिका कर्मचारी जगदीश नगरकर यांनी दाखवून दिले आहे. वयाच्या 49 व्या वर्षी खडतर प्रवास करत त्यांनी विधी शाखेची पदवी मिळवली आहे. स्मशानभूमीत मृत्यु नोंदणी कारकून म्हणून काम करत त्यांनी ही पदवी मिळवली आहे. नक्कीच त्यांचा हा संघर्ष वाखाणणण्याजोगा आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...Body:गरीब परिस्थिती मात्र जिद्दीच्या जोरावर नगरकर यांनी एलएलबी होण्याचा मान मिळवला आहे. लहानपणापासूनच खडतर मार्ग, वडिलांचे लहानपणीच हरवलेले छत्र, झोपडपट्टीतील राहणं या परिस्थितीत ही शिक्षणाची आवड नगरकर यांना यशापर्यत घेऊन गेली. 1989 साली नगरकर पालिकेत हंगामी पद्धतीत कामाला लागले. त्यानंतर त्यांची चतुर्थीश्रेणीत निवड झाली. कुटुंबाचे ओझे अंगावर असतानाही त्यांनी वाणिज्य शाखेतून 2005 साली पदवी संपादन केली. 2014 साली त्यांनी विधी शाखेत प्रवेश घेतला. त्यावेळी ते भोईवाडा स्मशानभूमीत काम करत होते. या स्मशानभूमीत त्यांनी पुन्हा अभ्यासाला सुरवात केली. स्मशानभूमी सारखी शांतता कुठे भेटत नाही असेही नगरकर सांगतात. 2019 साली त्यांनी विधी शाखेत पदवी मिळवली व पालिकेच्या विधी शाखेत बदली मिळावी यासाठी अर्ज केला. त्यांचा अर्ज मान्य करत त्यांना नोटीस कारकून या पदावर घेण्यात आले. पुढे अजून शिकायचं असून चतुर्थक्षणी कामगारांना शिकवायचं आहे असं स्वप्न घेऊन नगरकर निघाले आहेत.

बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर मी चाललो आणि आज इथपर्यत पोहचलो आहे. माझं लहानपण अनेक समस्यानी भरलेले होते. 1 ते 8 वीचे शिक्षण पालिकेत झाले. त्यानंतर माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. विद्यालयीन शिक्षण आंबेडकर महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर विधी शाखेत प्रवेश घेतला. बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाच्या मंत्राने मी हे शिक्षण पूर्ण केले. पुढे अजून शिकणार आहे. जीवनात संघर्ष पाहिला मात्र शिक्षणाने आज इथपर्यत पोचवलं असे नगरकर यांनी सांगितले.

Note

स्टोरी आवडल्यास exclusive हा टॅग वावरापा ही विनंती

Conclusion:
Last Updated : Feb 10, 2020, 8:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.