ETV Bharat / city

बेकायदा पार्किंगवर पालिकेची कारवाई; महिनाभरात ६७ लाखांचा दंड वसूल - महापालिकेने उपलब्ध करून दिलेले वाहनतळ

महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या वाहनतळावर गाडी पार्किंग न करता रस्त्यात पार्किंग केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या बेकायदा पार्किंगला आळा बसावा म्हणून महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

बेकायदा पार्किंगवर महापालिकेची कारवाई
author img

By

Published : Aug 12, 2019, 8:31 PM IST

मुंबई - शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी तसेच बेकायदा पार्किंगला आळा बसावा म्हणून महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरात १०४१ वाहनांवर कारवाई करत महापालिकेने तब्बल ६७ लाख ६५ हजार ५६५ रुपये दंड वसूल केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.

महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या वाहनतळावर गाडी पार्किंग न करता रस्त्यात पार्किंग केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. यामुळे महापालिका प्रशासनाने बेकायदा पार्किंगला आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई सुरू केली. वाहन तळालगतच्या ५०० मीटर परिसरात बेकायदा पार्किंग केल्यास वाहनचालकाकडून दंड वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ७ जुलैपासून करण्यात येत आहे.

Illegal parking
बेकायदा पार्किंगवर महापालिकेची कारवाई
अवजड वाहन बेकायदा पार्किंग केल्यास दहा हजार व ५ हजार टोचन असे एकूण १५ हजार रुपये वसूल करण्यात येत आहेत. तर चारचाकी वाहनासाठी टोचनसह १० हजार रुपये आणि दुचाकीसाठी ५ हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. मुंबईत १४६ वाहनतळांची जागा राखीव असून त्यावर ३४ हजार ८०८ वाहने उभी करण्याची सुविधा आहे. मात्र, सध्या पालिकेच्या ताब्यात असलेल्या २६ वाहनतळांच्या परिसरात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. महिनाभरात ६८४ चारचाकी, २४ तीनचाकी, ३३३ दुचाकी अशा एकूण १०४१ वाहनांवर महापालिकेने कारवाई केली असून ६७ लाख ६५ हजार ५६५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पालिकेच्या एकूण सात परिमंडळांपैकी परिमंडळ क्र. २ मध्ये सर्वात जास्त ९ लाख २७ हजार ५५ रुपये दंड वसुली करण्यात आली, तर परिमंडळ क्र. ५ मध्ये सर्वात कमी ३० हजार ११० रुपये दंडवसुली करण्यात आल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्याने दिली.

Intro:मुंबई - शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी तसेच बेकायदा पार्किंगला चाप बसावा म्हणून महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गेल्या महिनाभरात १०४१ वाहनांवर कारवाई करत तब्बल ६७ लाख ६५ हजार ५६५ रुपये दंड वसूल केल्याची माहिती पालिकेच्या अधिका-याने दिली.Body:पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या वाहनतळावर गाडी पार्किंग न करता रस्त्यात पार्किंग केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने बेकायदा पार्किंगला आळा घालण्यासाठी दंडाची कारवाई सुरू केली. वाहनतळालगतच्या ५०० मीटर परिसरात बेकायदा पार्किंग केल्यास वाहनचालकाकडून दंड वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. याची अंमलबजावणी ७ जुलैपासून करण्यात येत आहे.

अवजड वाहनासाठी बेकायदा पार्किंगबद्दल दहा हजार व टोचन ५ हजार असे १५ हजार रुपये वसूल करण्यात येत आहेत. तर चारचाकी वाहनासाठी टोचनसह १० हजार रुपये, दुचाकीसाठी ५ हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. मुंबईत १४६ वाहनतळांची जागा राखीव असून त्यावर ३४ हजार ८०८ वाहने उभी करण्याची सुविधा आहे. मात्र सध्या पालिकेच्या ताब्यात असलेल्या २६ वाहनतळांच्या परिसरात दंडात्मक कारवाई सुरू आहे.

महिनाभरात ६८४ चारचाकी, २४ तीनचाकी, ३३३ दुचाकी अशा एकूण १०४१ वाहनांवर कारवाई करण्यात येऊन ६७ लाख ६५ हजार ५६५ रुपये दंड वसूल करण्यात आला. पालिकेच्या एकूण सात परिमंडळांपैकी परिमंडळ २ मध्ये सर्वात जास्त म्हणजे ९ लाख २७ हजार ५५ रुपये दंड वसुली करण्यात आली, तर परिमंडळ ५ मध्ये सर्वात कमी म्हणजे ३० हजार ११० रुपये दंडवसुली करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

बातमीसाठी कारवाईचा फाईल फोटो पाठवत आहे तो वापरावा Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.