मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी गंभीर आरोपाच्या निषेधार्थ भाजपा युवा मोर्चाने (BJP) मंत्रालयाबाहेर उग्र आंदोलन केले. नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी त्यांचा पुतळा जाळण्यात आला. पोलिसांनी यावेळी आंदोलनकर्त्यांची धरपकड करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
भाजपचा इशारा
नोटबंदी काळात सापडलेल्या बोगस नोटांचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरण दडपले, असा गंभीर आरोप केले. भाजपाने याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. मंत्रालयासमोरील सिग्नल जवळ नवाब मलिक यांच्याविरोधात आंदोलन केले. नवाब मलिक हाय हाय, मलिकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच मलिक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवला. मलिकांनी फडणवीसांच्या विरोधात आरोप करणे थांबवावे. महाराष्ट्राला गुमराह करणे बंद करावे, मलिक वायफळ बंद थांबवत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याविरोधात निषेध नोंदवणार असा इशारा, युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
काय आहेत मलिक यांचे आरोप
नोटबंदी काळात बीकेसीमध्ये ८ ऑक्टोबर २०१७ बोगस नोटांचे कनेक्शन आयएसआय (ISI), पाकिस्तान व्हाया बांग्लादेश यांच्यामार्फत बोगस नोटा संपूर्ण देशात पसरवल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. १४ कोटी ५६ लाख लाखांच्या बोगस नोटा पकडण्यात आल्या. नवीमंबईत ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मुंबई एक आणि पुण्यातून एक अशा दोघांना अटक केली. इम्रान आलम शेख, रियाज शेख अशी त्या आरोपींची नावे आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दडपण्यासाठी १४ कोटी ५६ लाख बोगस नोटांमधून ८ लाख ८० हजार रुपये दाखवले, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून केला. पाकिस्तानची बोगस नोट भारतात चालावी? प्रकरण दाबले गेले. शिवाय, काही दिवसातच जामीन मिळतो. हे प्रकरण एनआयएकडे दिले जात नाही. नोटा कुठून आल्या. याची अंतिम चौकशी होत नाही. कारण जे बोगस नोटांचे रॅकेट चालवत होते, त्यांना तत्कालिन सरकारचे संरक्षण होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.