ETV Bharat / city

‘मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार!’, भाविकांच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा - hunger strike to open temples

'गेल्या साडेसहा महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडावेत, यासाठी भाविकांनी अनेकवेळा मागणी केली. राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले, तरीही महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. उलट राज्यात मदिरेचे बार उघडण्यात आले. ‘मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार!’, अशी अवस्था झाली आहे. मंगळवारी (ता. 13 ऑक्टोबर) राज्यभर विविध ठिकाणी प्रमुख मंदिरांसमोर सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भाविकांतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. याला भाजपचा पाठिंबा आहे,' असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील न्यूज

author img

By

Published : Oct 10, 2020, 3:24 PM IST

मुंबई - 'संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिरे बंद असे चित्र उभे केले आहे. राज्यातील प्रमुख धर्माचार्य, विविध संप्रदायांचे साधू-संत, अनेक धार्मिक व आध्यात्मिक संघटना यांच्यातर्फे 13 ऑक्टोबर रोजी मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टीचा या उपोषणाला पाठिंबा असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभागी व्हावे,' अशी सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिली.

हेही वाचा - हरिद्वारच्या तीर्थ पुरोहितांकडे पिढ्यान्-पिढ्यांच्या नोंदी, न्यायालयातही ग्राह्य आहेत ही 'वही-खाती'

'गेल्या साडेसहा महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडावेत, यासाठी भाविकांनी अनेकवेळा मागणी केली. राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले, तरीही महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. उलट राज्यात मदिरेचे बार उघडण्यात आले. ‘मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार!’, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या समन्वयातून मंगळवारी (ता. 13 ऑक्टोबर) राज्यभर विविध ठिकाणी प्रमुख मंदिरांसमोर सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भाविकांतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. विविध संप्रदायांचे साधू-संत, धर्माचार्य, पुरोहित उपोषणात सहभाग होणार आहेत. फूल-प्रसाद विक्रेते, मंदिरांवर उपजीविका अवलंबून असलेले सर्व व्यावसायिक हे सुद्धा उपोषणात सहभागी होणार आहेत. या लाक्षणिक उपोषणाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पाठिंबा आहे. भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपोषणात सक्रीय सहभागी होतील. कार्यकर्त्यांनी कोरोनासबंधीचे सर्व नियम पाळून सहभागी व्हावे,' असे पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - नाशिकच्या कांद्याचा वांदाच...केंद्राकडून 'या' दोन प्रकारच्या कांदा निर्यातीला परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.