मुंबई - काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjyotsingh siddhu) यांनी काल पाकिस्तानसंबधी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कर्तारपूर कॉरिडोरसाठी पाकिस्तानात गेलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे मोठे बंधू असल्याचे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज भारतीय जनता पक्षातर्फे घाटकोपर येथे आमदार राम कदम (Ran kadam) यांच्या नेतृत्वाखाली सिद्धू यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच सिद्धू यांच्या पुतळ्याला काळे फासण्यात आले आहे. पुतळ्याला जोडे मारण्यात आले. सिदधूने देशाची माफी मागावी अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली आहे.
Siddhu controversial statement : सिद्धू यांच्याविरोधात भाजपची जोरदार निदर्शने - कर्तारपूर कॉरिडोर
“इमरान माझे मोठे बंधू आहेत. त्यांनी मला खूप प्रेम दिले आहे,” असे ते म्हणाले. काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjyotsingh siddhu) विधानानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.