मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्या माझगाव येथील ( IT raids on Yamini Jadhav home ) घरी आज प्राप्तिकर विभागाने धाड पडली आहे. विधानसभा निवडणूकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यात चुकीची माहिती दिल्याने ही धाड असल्याचे भाजपकडून ( BJP on IT raids in Mumbai ) सांगण्यात आले आहे.
प्राप्तिकर विभागाची धाड -
शिवसेना उपनेते आणि पालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( IT raids on Yashwant Jadhav home ) यांच्या घरी पहाटे सहा वाजता प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. यशवंत जाधव यांच्या माझगाव मधील दोन घरांवरील धाडीनंतर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी ( IT probe of Yashwant Jadhav property ) तपास करत आहेत. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी यशवंत जाधव यांचे पीए, पालिकेतील कंत्राटदार यांच्यावर मुंबईत २५ ठिकाणी धाडी टाकून तपासणी सुरू केला आहे. माझगाव, काळाचौकी, मालाड, बोरिवली, मुलुंड आदी ठिकाणी या धाडी पडल्या आहेत. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लाँडरिंग आणि १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी केंद्रीय यंत्रणांकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने या धाडी असल्याचे समजते. दरम्यान यशवंत जाधव यांच्यावर १५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी युएईला हलवल्याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.
हेही वाचा-Ukraine Russia Crisis : लवकरात लवकर मदत; युक्रेनमधील विद्यार्थ्यांचं सरकारला आवाहन
प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याने कारवाई -
भाजपने प्राप्तिकर विभागाच्या धाडीबाबत माहिती देण्यात आली आहे. पालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे म्हणाले, की शवंत जाधव यांच्यावर प्राप्तिकर विभागाची धाड पडली हा प्रकार जुनाच आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत आमदार झालेल्या यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यात त्यांनी चुकीची माहिती देण्यात आल्याच्या बातम्या ऑगस्ट २०२१ मध्ये आल्या होत्या. निवडणूक विभागाने हे प्रकरण प्राप्तिकर विभागाकडे पाठविले होते. त्यानुसार केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे. ते नियमानुसार काम करत आहेत,
कॅगमार्फत लेखापरीक्षण करा -
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात गेले २ वर्षे आम्ही आवाज उचलत आहोत. कोरोना काळातील २१०० कोटी खर्चाचा प्रस्ताव आला. त्याला आम्ही विरोध केला होता. तरीही शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादीला सोबत घेऊन तो प्रस्ताव मंजूर केला. आम्हाला बोलू दिले जात नाही. असेच प्रस्ताव मंजूर केले जातात, त्यासाठी आम्ही यशवंत जाधव यांच्या विरोधात महापौरांना अविश्वास ठराव दिला आहे. त्यांनी त्यावर अद्याप चर्चा घडवून आणलेली नाही. कोविडवर आतापर्यंत ३८०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याची चौकशी करावी, म्हणून महापौर आणि आयुक्तांना पत्र दिले आहे. याची चौकशी केली जात नसल्याने, कॅगमार्फत ऑडिट करावे अशी मागणी केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा-Income Tax Raids : लक्षात ठेवा! तपास यंत्रणा दुधारी तलवार, त्या दोन्ही बाजूने वापरता येतात -पेडणेकर
अशा कारवायांनी भाजपवाल्यांना आसूरी आनंद
शिवसेनेला नाही तर सर्व सरकारलाच डॅमेज करण्याचा यांचा प्रयत्न आहे. मात्र, हे लोकांना समजते. अशा कोणत्याही कारवायांनी ना शिवसेना डॅमेज होईल ना हे सरकार डॅमेज होईल. अशा कारवायांनी भाजपवाल्यांना आसूरी आनंद होणार असेल तर हा आनंद त्यांना लखलाभो, असेही महापौर म्हणाल्या आहेत. तसेच, मी जाधव यांच्या चौकशीत कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असेही त्या म्हणाल्या आहेत.