मुंबई - देशात कोणत्याही राज्यात निवडणुकांमध्ये भाजप विजयी होत असेल, तर मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात याचा आनंद उत्सव साजरा करण्यात येतो. मात्र, आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये भाजपचा जवळजवळ पराभूत झाला आहे. त्यामुळे मुंबई भाजप कार्यालयात शुकशुकाट दिसत आहे. भाजप नेत्यांनी अद्याप दिल्ली विधानसभेच्या निकालावर प्रतिक्रिया देखील दिलेली नाही.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला तिसऱ्यांदा विजय मिळताना दिसत आहे. भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपले सर्व मोठे नेते प्रचारासाठी उतरवले होते. मात्र, निकालानंतर भाजप अचंबित झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच मुंबई भाजप कार्यालयात शुकशुकाट पसरलेला आहे. कोणतेही भाजप नेते या कार्यालयाकडे फिरकलेच नाही. याबाबत भाजप प्रदेश कार्यालयातून आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...