ETV Bharat / city

BJP Morcha : उद्धवजी, बाळासाहेबांना काय उत्तर द्याल? फडणवीसांचा सवाल; भाजपा नेत्यांना घेतले ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब यांच्या अटकेनंतर राजीनाम्याची मागणी भाजपाकडून केली जात आहे. या मागणीसाठी भाजपाकडून आझाद मैदानावर महामोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी भाजपा नेत्यांना आपली भाषणं दिली आहे. यानंतर पोलिसांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेतले.

BJP Morcha
BJP Morcha
author img

By

Published : Mar 9, 2022, 1:35 PM IST

Updated : Mar 9, 2022, 4:54 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब यांच्या अटकेनंतर राजीनाम्याची मागणी भाजपाकडून केली जात आहे. या मागणीसाठी भाजपाकडून आझाद मैदानावर महामोर्चा काढण्यात आला आहे. भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर परखड शब्दांत टीका केली. तसेच नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार यावेळी भाजपाने केला. आझाज मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यानंतर पोलिसांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेतले.

फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांना घेतले ताब्यात

तेव्हा काय उत्तर द्याल -

आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून निशाणा साधला. ते म्हणाले, जर अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला जातो, संजय राठोडांचा राजीनामा घेतला जातो, तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? कुणाच्या दाढ्या कुरवाळताय म्हणून तुम्ही राजीनामा घेत नाहीत?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे. शरद पवार म्हणतात राजीनामा देऊ देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात राजीनामा देऊ देणार नाही. उद्धवजी, तुमचं आमचं जमत नसेल, सोडून द्या. पण एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे. तेव्हा तुम्हाला विचारलं जाईल, अशी व्यक्ती तुमच्यासोबत मंत्रिमंडळात होती. तेव्हा काय उत्तर द्याल? आम्ही तर बाळासाहेबांना सांगू, की नाही बाळासाहेब, आम्ही संघर्ष केला. पण काय करणार, आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. ते सत्तेसाठी एवढे आंधळे होते, की ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत. कारण त्यांना माहिती होतं, की राजीनामा घेतला, तर माझं सरकार जाईल, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

हेही वाचा - Walse Patil On Fadnavis Allegation : फडणवीसांच्या आरोपांचं 'उद्या दूध का दूध, पाणी का पाणी' करणार : गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा इशारा

हा देशद्रोह्यांच्या विरोधात संघर्ष -

नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय संघर्ष थांबणार नसल्याचं फडणवीस म्हणाले. ते म्हणाले, हा देशद्रोह्याच्या विरोधात हा संघर्ष आहे. पाकिस्तानधार्जिण्या लोकांच्या विरोधात हा संघर्ष आहे. जोपर्यंत बॉम्बस्फोटाचे आरोपी असलेल्यांसोबत व्यवहार करून जेलमध्ये गेलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही. आम्ही काही रोज राजीनामे मागत नाहीत. ही घटना राज्यासाठी लाजिरवाणी आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार अशा भाजपाच्या इतरही ज्येष्ठ नेत्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

ताब्यात घेऊन केली सुटका -

आंदोलनस्थळाहून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, नितेश राणे यासह इतरही नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली.

Last Updated : Mar 9, 2022, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.