ETV Bharat / city

'बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्या 'त्या' भाजप पदाधिकाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी' - बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार

डोंबिवली शहरात भाजपचा एक पदाधिकारी गेली 4 वर्षे बंदुकीचा धाक दाखवून मुलीवर शारीरिक अत्याचार करत होता. त्या भाजप पदाधिकाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली.

MLA Dr. Manisha kayande and NCP leader Vidya Chavan
आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण
author img

By

Published : Jan 10, 2020, 9:27 PM IST

मुंबई - डोंबिवली शहरात भाजपचा एक पदाधिकारी गेली 4 वर्षे बंदुकीचा धाक दाखवून, एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करत होता. संदीप माळी असे त्या भाजपच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. या भाजप पदाधिकाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या, आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे. शिवालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.

आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांची पत्रकार परिषद...

हेही वाचा... अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा

डोंबिवली शहरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर भाजपचा पदाधिकारी गेली 4 वर्षे बंदुकीचा धाक दाखवून शारीरिक अत्याचार करत होता. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्याला पॉक्सो कायद्याखाली अटक केली होती. मात्र त्याला जामीन मिळाला. त्यानंतरही संबंधित पदाधिकारी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांना त्रास देत आहे. यामुळे आरोपी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला येत्या सुनावणीत जामीन मिळू नये, लवकरात लवकर निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी मिळण्यापूर्वी त्याला न्यायालयाने शिक्षा द्यावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी केली.

हेही वाचा... लंकेश हत्या प्रकरण: हृषीकेश देवडीकर औरंगाबादेत चालवायचा पतंजलीचे दुकान

त्याचप्रमाणे पीडित मुलीसह तिचे पालक व लहान बहीण हिला देखील धमकवण्याचे काम सुरू आहे. याबाबत तक्रार करायला गेल्यावर पीडितेची तक्रार न दाखल करता, ती टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करावी, अशी मागणीही कायंदे यांनी केलीय. तसेच या प्रकरणातील सरकारी वकील बदलून महिला वकिलाची नेमणूक करावी असे म्हटले आहे.

हेही वाचा... मुंबईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश.. बॉलिवूडच्या दोन महिला कलाकारांना अटक

पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेण्यात येणार आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशा प्रवृत्तीच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला पक्षात थारा न देता त्याला पक्षातून काढून टाकण्याची कारवाई करावी. राजकारण बाजूला ठेवून पीडित मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तिला मदत करावी. यासाठी लवकरच राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आम्ही एकत्र या नेत्यांची भेट घेणार असल्याचे कायंदे म्हणाल्या आहेत.

हेही वाचा... समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला 'छपाक', काँग्रेसने दिला पोस्टर सपोर्ट

प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आरोपी संदीप माळी मला व माझ्या कुटुंबीयांना धमकावत आहे. त्यामुळे लवकरात लवकर माळी याला शिक्षा होऊन मला न्याय मिळावा, अशी मागणी पीडित तरुणीने यावेळी बोलताना केली. कोणत्याही पक्षात संदीप माळीसारखे पदाधिकारी असतील तर त्यांना बडतर्फ करायला हवे. अशा आरोपींचा जामीन रद्द होऊन ते जेलमध्ये असायला हवे. आमचे सरकार सत्तेत आले आहे, त्यामुळे अशा अत्याचारांना थांबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटले.

Intro:
मुंबई- डोंबिवली शहरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर भाजपचा पदाधिकारी गेली 4 वर्षे बंदुकीचा धाक दाखवून शारीरिक अत्याचार करत होता. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्याला पॉक्सो कायद्याखाली अटक केली होती. मात्र जामीन मिळाल्यानंतरही संबंधित पदाधिकारी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबियांना त्रास देत आहे. यामुळे संबंधित आरोप असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला येत्या सुनावणीत जामीन मिळू नये व लवकरात लवकर निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी मिळण्यापूर्वी याला न्यायालयाने शिक्षा द्यावी अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे व राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी शिवालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
Body: पीडित मुलीसह तिचे पालक व लहान बहीण हिला देखील धमकवण्याचे काम सुरू असताना तक्रार करायला गेल्यावर पीडितेची तक्रार न करता ती टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी कायंदे यांनी केलीय. तसेच या प्रकरणातील सरकारी वकील बदलून महिला वकिलाची नेमणूक करण्यात यावी असे कायंदे म्हणाल्या.
पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेण्यात येणार आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशा प्रवृत्तीच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला पक्षात थारा न देता त्याला पक्षातून काढून कारवाई करावी. राजकारण बाजूला ठेवून पीडित मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तिला मदत करावी यासाठी लवकरच राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आम्ही एकत्र भेट घेणार असल्याचे कायंदे म्हणाल्या.

प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आरोपी संदीप माळी मला व माझ्या कुटुंबियांना धमकावत आहे. त्यामुळे लवकरात लवकर माळी याला शिक्षा होऊन मला न्याय मिळावा अशी मागणी पीडित तरुणीने केलीय.
कोणत्याही पक्षात संदीप माळी सारखे पदाधिकारी असतील तर त्यांना बडतर्फ करायल हवे. अशा आरोपींचा जामीन रद्द होऊन ते जेलमध्ये असायला हवे. आमचं सरकार सत्तेत आलं आहे, त्यामुळे अशा अत्याचारांना थांबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.