ETV Bharat / city

Vijay Gawhane joins NCP : परभणीतील भाजपला मोठा धक्का, विजय गव्हाणे यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश! - भाजप नेते विजय गव्हाणे राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, की १४ जानेवारी हा दिवस आपल्या अंत:करणात कायमचा राहतो. या दिवशी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा जो निर्णय घेतला, तो आपल्या स्वाक्षरीने झाला ( Sharad Pawar on Marathwada University name change ) होता. त्याच्या पुर्वसंध्येला प्रदेश कार्यालयात अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे. फुले-शाहू-आंबेडकर ( Sharad Pawar on Shau Phule Ambedkar ) आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर आधारीत समाजकारण करण्याची आवश्यकता आहे.

विजय गव्हाणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
विजय गव्हाणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
author img

By

Published : Jan 13, 2022, 4:48 PM IST

मुंबई - परभणीतील भारतीय जनता पक्षाचे नेते विजय गव्हाणे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( BJP leader Vijay Gawhane joins NCP ) प्रवेश केला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, सर्व समाज घटकातील लोकांना सोबत घेऊन एक प्रभावी पक्ष तयार करण्याचा प्रयत्न होईल. या कामात विजय गव्हाणे यांची साथ मिळेल.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, की चुकीच्या विचारांकडे काही लोक गेले आहेत. त्यांचे मनपरिवर्तन करून विजय गव्हाणे त्यांना राष्ट्रवादीत आणतील. परभणी जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ नेते आज उपस्थित आहेत. यांच्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाने परभणी जिल्हा प्रागतिक विचारांचा जिल्हा राज्याला दिसेल. तसेच उर्वरीत महाराष्ट्रातही फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार मजबूत करण्याचे काम होईल, अशी आशाही शरद पवार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा- Maharashtra Corona : घाबरू नका! फक्त 14 टक्केच लोकं रूग्णालयात; तर 0.32 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर -टोपे

पुढे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले, की १४ जानेवारी हा दिवस आपल्या अंत:करणात कायमचा राहतो. या दिवशी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा जो निर्णय घेतला, तो आपल्या स्वाक्षरीने झाला ( Sharad Pawar on Marathwada University name change ) होता. त्याच्या पुर्वसंध्येला प्रदेश कार्यालयात अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे. फुले-शाहू-आंबेडकर ( Sharad Pawar on Shau Phule Ambedkar ) आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर आधारीत समाजकारण करण्याची आवश्यकता आहे. त्याला शक्ती देण्याचा निर्णय आज सहकाऱ्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा-राज्यात एकूण 14 कोटी नागरिकांचे लसीकरण, पाहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण 90 टक्के

परभणी राजकीयदृष्ट्या जागरुक जिल्हा

परभणी जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा आहे. राजकीयदृष्ट्या जागरूक जिल्ह्यांपैकी एक असलेला हा जिल्हा आहे. एक काळ असा होता १९४७-४८ साली परभणीतील एक मोठा वर्ग काँग्रेससोबत होता. त्यानंतर जिल्ह्याने एका नव्या पक्षाला साथ दिली, तो पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष होता, अशी आठवण राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी सांगितली.

हेही वाचा-India Corona Updates : देशात मागील 24 तासात दोन लाखांपेक्षा जास्त रूग्णांची नोंद

गव्हाणे हे दोस्तीला पक्के

अण्णासाहेब गव्हाणे हे परभणीसह मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते, राज्याच्या विधीमंडळातील एक प्रभावी नेते होते. अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण नेते तयार झाले. घरोघरी प्रागतिक विचार पोहोचवण्यात हे नेतृत्व यशस्वी झाले होते. त्यामुळे अशी पार्श्वभूमी असलेले परभणीकर आणि परभणीचे सर्व सहकारी यांनी हा प्रागतिक विचार घेऊन पुढे आले, त्यापैकीच एक आक्रमक नेतृत्व म्हणजे विजय गव्हाणे असेही शरद पवार म्हणाले. गव्हाणे हे दोस्तीला पक्के ( Sharad Pawar praises Vijay Gawhane ) आहेत. त्यामुळेच ते त्यांचे मित्र गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत भाजपमध्ये गेले. गोपीनाथ राजकारणात आमचे विरोधक असले तरी त्यांनी व्यक्तिगत सलोखा कधी सोडला नसल्याचे यावेळी शरद पवार यावेळी म्हणाले.

हे नेते होते उपस्थित-

यावेळी परभणी येथील माजी आमदार विजय गव्हाणे, वर्धातील मनसेचे नेते अतुल वांदिले, पुणे येथील आरपीआयचे नेते प्रदीप साठे, श्रध्दा साठे, नांदेड येथील बाळासाहेब जाधव, डॉ. सोनकांबळे, पैठणमधील किशोर दसपुते आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार फौजिया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार संदीप क्षीरसागर, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, ज्येष्ठ गायक आनंद शिंदे व सुबोध मोहिते आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.