मुंबई - मातोश्री बंगल्याबाहेर शुक्रवारी ( 22 एप्रिल ) भाजपचे नेते मोहित कंबोज ( Mohit Kamboj ) यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्याप्रकरणी कंबोज सांताक्रूझ पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी एफआयआरमध्ये फेरफार केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला ( Mohit Kamboj Alleged Santacruz Police ) आहे.
मोहित कंबोज म्हणाले, सांताक्रूझ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून एफआयआरमध्ये फेरफार करण्यात आली. माझा एफआयआर नोंदवला गेला, त्यावर स्वाक्षरी केली. मात्र, एफआयआर नष्ट केला आहे, कारण तो भाजपविरोधातील त्यांच्या अजेंड्याला अनुकूल नव्हता, असेही त्यांनी म्हटले आहे.
पोलीस सरकारच्या दबावाखाली - पोलीस सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. अगोदरच्या एफआयआरमध्ये 307 सारखे गुन्हे नोंदवण्यात आले होते. परंतु, त्यानंतर तो एफआयआर बदलण्यात आला, असा आरोपही कंबोज यांनी केला आहे.
हल्ला शिवसैनिकांनी केला - मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. तो हल्ला शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे त्या शिवसैनिकांवर तक्रार नोंदवण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी केली आहे.
हेही वाचा - Chhagan Bhujbal Statement : 'पूजा-अर्चा करणे पुरोहित समाजाचा धंदा, धर्म नाही'