मुंबई - काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या बद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला आहे. याविषयी चौधरी व काँग्रेस हायकमान सोनिया गांधी यांनी माफी मागावी याकरता मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.
सोनिया गांधी यांना माफी मागावीच लागेल - काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून एकीकडे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ बघायला भेटला. तर दुसरीकडे या वक्तव्यावरून देशामध्ये भाजपने आंदोलन पुकारले आहे. आज मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मुंबई भाजप तर्फे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी अधीर रंजन चौधरी तसेच सोनिया गांधी यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच जोपर्यंत सोनिया गांधी व अधीर रंजन चौधरी हे देशातील तमाम आदिवासी बांधवांची माफी मागत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आमदार मनीषा चौधरी यांनी सांगितल आहे.
एकही कार्यक्रम करू दिला जाणार नाही - याबाबत उद्या पासून राज्यात विविध ठिकाणी अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे. तसेच, जोपर्यंत अधीरंजन चौधरी व सोनिया गांधी माफी मागत नाहीत, तोपर्यंत काँग्रेसला मुंबईत एकही कार्यक्रम करू दिला जाणार नाही, असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी दिला आहे.
हेही वाचा - Sushma Andhare joins Shiv Sena : सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश; उपनेतेपदी नियुक्ती