ETV Bharat / city

मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यास पगारी रजा द्या- भाजपची आयुक्तांकडे मागणी - मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना कोरोना

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना विलगिकरणाच्या कालावधीत भर पगारी रजा ( leave with salary ) द्यावी, असे पालिकेने परिपत्रक जारी न केल्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांना पूर्ण बरे होईपर्यंत भर पगारी रजा देण्याची मागणी भाजपचे स्वीकृत नगरसेवक भालचंद्र शिरसाट ( BJP leader Bhalchandra Shirsat ) यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट

author img

By

Published : Jan 18, 2022, 10:25 PM IST

मुंबई - मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास एकही दिवस पूर्ण पगारी सुट्टी ( leave without salary ) दिली जात नाही. त्यामुळे, या कर्मचाऱ्यांच्या सात दिवसांचे पगार कापले गेले आहेत. यामुळे कोरोना होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ते पूर्ण बरे होईपर्यंत पूर्ण पगारी रजा देण्याची मागणी भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट ( BJP leader Bhalchandra Shirsat ) यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

गेले दोन वर्षे मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार ( covid 19 spread since 2 years ) आहे. या प्रसारादरम्यान मुंबईकरांना सोयी व आरोग्य सुविधा देण्यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी काम करत आहेत.

१७ दिवसांची सुट्टी -
मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणुचा प्रसार सुरू झाला. तेव्हापासून १०० टक्के उपस्थितीत पालिका कर्मचारी सेवा बजावित आहेत. आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा आल्या आहेत. या दोन लाटा दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आल्यास पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना १७ दिवसांची भरपगारी सुट्टी देण्यात येत होती. त्यामुळे, करोनाबाधित झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवा बजावण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत होता. तसेच, हा कालावधी भरपगारी गणला गेल्याने कर्मचाऱ्याचे आर्थिक नुकसान झाले नव्हते.

हेही वाचा-Nagpur Crime : पतीकडून पत्नीसह दोन चिमुरड्यांची हत्या; स्वत: केली आत्महत्या

कोरोना झाल्यास कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान -
डिसेंबरपासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आली. यात अनेक पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. या तिसऱ्या लाटेत
कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी दिली गेली नाही. पालिकेने करोनासंदर्भात सात दिवस विलगीकरणाचा नियम लागू केला आहे. त्याप्रमाणे, या कर्मचाऱ्यांना सात दिवस विलगीकरणात राहावे लागत आहे. पालिकेने या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याबाबत कोणतेही परिपत्रक काढलेले नाही. त्याचा परिणाम म्हणून कोरोनाबाधित पालिका कर्मचाऱ्यांना सात दिवस बिनपगारी सुट्टी घ्यावी लागत आहे. यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

आयुक्तांना पत्र -
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना विलगिकरणाच्या कालावधीत भर पगारी रजा ( leave with salary ) द्यावी, असे पालिकेने परिपत्रक जारी न केल्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांना पूर्ण बरे होईपर्यंत भर पगारी रजा देण्याची मागणी भाजपचे स्वीकृत नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे ( Bhalchandra Sihrsat letter BMC commissioner ) पत्राद्वारे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.