मुंबई - महानगरपालिकेतील अंधेरी पुर्व विभागातील भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीत बोगस ठरल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. तर शिवसेना उमेदवार संदिप नाईक यांना नगरसेवक पद जाहीर करण्यात आले. त्यामुळे मुंबई महापालिकेत आता शिवसेनेचे संख्याबळ वाढून ते 97 वर पोहचले आहे.
हेही वाचा... भिवंडीत अग्नीतांडव सुरूच; सायजींग-डाईंग कारखान्याला भीषण आग
मुंबई महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ 96 वरून आता 97 वर पोहचले आहे. अंधेरी पूर्व विभागातील वॉर्ड क्रमांक 81 मधील भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी दरम्यान बोगस ठरल्यामुळे मुंबई हायकोर्टाने मुरजी पटेल यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश कोकण आयुक्तांना दिले होते. त्याची अंमलबजावणी करत मुंबई महापालिका आयुक्तांनी भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांचे नगरसेवक पद रद्द केले. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेले शिवसेना उमेदवार संदिप नाईक यांना नगरसेवक पद जाहीर केले आहे. त्यानुसार वॉर्ड क्रमांक 81 चे नगरसेवक म्हणुन संदिप नाईक उद्या मुंबई महापालिका मुख्यालयात नगरसेवक पद स्विकारणार आहेत.
हेही वाचा... 'तुम्ही रामदेवबाबांना जमिनींची खैरात वाटली तशी आम्ही नाही वाटली'