ETV Bharat / city

'पी-305 बार्ज' दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 49 वर; बचावकार्य सुरुच

Barge P 305 : So far 37 dead bodies have been recovered from Arabian sea. All these were employees of Barge P305. INS Kolkata returned to dock late night; while INS Kochi is still on the rescue operation. So far 188 employees out of 261 have been rescued.

Barge P305 Rescue operation
'बार्ज पी३०५' वरील ३७ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळले; १८८ जणांना वाचवण्यात यश, बचावकार्य सुरुच..
author img

By

Published : May 20, 2021, 10:02 AM IST

Updated : May 20, 2021, 6:38 PM IST

18:37 May 20

'पी-305 बार्ज' दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 49 वर

मुंबई - तोक्ते चक्रीवादळात अडकलेल्या पी 305 बार्जवरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत. आतापर्यंत 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत 49 कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  

13:37 May 20

बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी केली विनंती..

बार्ज पी ३०५वर अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा आपल्या आप्तांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपल्या नातेवाईकांबाबत माहिती कळवावी अशी विनंती केली आहे. त्यांनी सांगितले, की अ‌ॅफकॉन आणि ओएनजीसीच्या हेल्पलाईनवर संपर्क साधूनही कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

श्वेता भारती या महिलेचे पती राध्येशाम ठाकूर यांचा बार्जवरील कर्मचाऱ्यांमध्ये समावेश आहे. तसेच आणखी एका व्यक्तीने आपल्या भावाशी संपर्क होत नसल्याचे म्हटले आहे.

13:36 May 20

09:47 May 20

'बार्ज पी३०५' वरील ३७ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळले; १८८ जणांना वाचवण्यात यश, बचावकार्य सुरुच..

मुंबई - तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या बार्ज पी३०५ वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत. आतापर्यंत बार्जवरील 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचविण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत 37 कर्मचाऱ्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. 

आयएनएस कोची ही पुन्हा एकदा अरबी समुद्रातील बार्जवर मदतकार्यासाठी गेली असून; आयएनएस कोलकाता ही बुधवारी रात्री उशिरा नेव्हल डॉक मध्ये परतली आहे. या बरोबरच तटरक्षक दलाकडून सुद्धा भारतीय नौदलाला मदत केली जात आहे. अरबी समुद्रातील बार्ज पी३०५ जवळच्या परिसरामध्ये भारतीय नौदलाच्या एअरक्राफ्ट व जहाजांकडून शोध कार्य सुरू आहे.

Last Updated : May 20, 2021, 6:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.