ETV Bharat / city

'ईव्हीएम'सोबत मतपत्रिकेचा पर्याय आता उपलब्ध?; विधानसभा अध्यक्षांचा कायदा करण्याच्या सूचना - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले बातमी

स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांना आता ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विधानसभाअध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत.

NANA PATOLE
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
author img

By

Published : Feb 2, 2021, 10:24 PM IST

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांना आता ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विधानसभाअध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. या संबंधीचा कायदा महाराष्‍ट्र विधानमंडळाने करावा अशा प्रकारच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.

नागपुरचे रहिवाशी सतीश उके यांनी या संदर्भाचे निवेदन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना दिले होते. तसेच या संदर्भाची याचिका सादर केली होती. त्यामुळे आज (2 फेब्रुवारी) मुंबई विधानभवन येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयचे सचिव राजेंद्र भागवत, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग आणि राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिव भुपेंद्र गुरव उपस्थित होते.

राज्यातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा विकल्प मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. मतपत्रिका अथवा ईव्हीएम यापैकी कोणते माध्यम अधिक विश्वासार्ह आहे हे जनतेला ठरवू द्या असे मत याचिकाकर्ते सतीश उके यांनी व्यक्त केलं. तसेच ईव्हीएमसोबत मतदान पत्रिकेचा पर्याय मतदारांना उपलब्ध असला पाहिजे. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 328 प्रमाणे राज्यातील निवडणुकांच्या बाबत कायदा तयार करण्याचे अधिकार राज्य विधीमंडळाला आहेत. अनुच्छेद 328 नुसार राज्य विधानमंडळाला असलेल्या अधिकारानुसार अनुषंगिक कायदा तयार करुन राज्यातील जनतेला ईव्हीम व्यतिरिक्त मतपत्रिकेने मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात यावा. त्यावेळी मतदार आपल्या इच्छेनुसार ईव्हीएम किंवा मतपत्रिकाव्दारे मतदानाचा हक्क बजावू शकतील. असा ऊश्वास देखील सतीश उके यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - पालघरमध्ये 11 चिमुकल्यांना विषबाधा, उपचार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.