मुंबई - स्तनदा मातांसाठी रेल्वे स्थानकांवर एक स्वंतत्र कक्ष असावा या हेतूने मध्य रेल्वे प्रशासनाने चाईल्ड हेल्प फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पहिल्या टप्प्यात मुंबई विभागातील पाच स्थानकांवर शिशू स्तनपान केंंद्राची निर्मिती केली आहे. कल्याण आणि कुर्ला स्थानकात शिशू स्तनपान केंंद्र सुरू झाले आहे. तर येत्या काही दिवसात हार्बर मार्गावरील जीटीबी नगर, डॉकयार्ड राेड आणि बदलापूर स्थानकातील केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यामुळे लहान मुलांसह लाेकल, मेल-एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना माेठा दिलासा मिळणार आहे.
स्तनदा मातांना मिळणार दिलासा
रेल्वे स्थानकावरील वर्दळीच्या भागात स्तनदा मातांना बाळांना स्तनपान करताना अडचणीचे ठरते. त्यामुळे बाळांची भूक मिटविणे मातांना अडचणीचे ठरते. त्यामुळे स्तनदा मातांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने चाईल्ड हेल्प फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने रेल्वे स्थानकात एक स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. कल्याण आणि कुर्ला स्थानकात शिशू स्तनपान केंंद्र सुरू झाले आहे. तर येत्या काही दिवसात हार्बर मार्गावरील जीटीबी नगर, डॉकयार्ड राेड आणि बदलापूर स्थानकातील केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सर्वात पहिले शिशू स्तनपान केंद्र पालघर रेल्वे स्थानकावर उभारण्यात आले होते. त्यानंतर पश्चिम रेल्वे विभागातील बोईसर, वलसाड, उदवाडा, बिलीमोरा, नवसारी, उधना, सूरत व नंदुरबार येथे केंद्र सुरू केले आहेत. तर, आता मध्य रेल्वे भागातील रेल्वे स्थानकात शिशू स्तनपान केंद्र उभारले जाणार आहे. त्यामुळे लोकल, मेल, एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांना दिलासा मिळणार आहे.
असा असणार शिशू स्तनपान केंद्र
स्थानकातील एका ठिकाणी हा कक्ष उभारला आहे. कक्षाच्या माहितीसाठी कक्षाबाहेर मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेत लिहिले आहे. माता व तिच्या लहान बाळाव्यतिरिक्त या कक्षात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
उपक्रमाचे कौतुक
महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी महासंघटनाच्या अध्यक्षा, वंदना सोनावणे यांनी सांगितले की, शिशू स्तनपान केंद्र सुरू करणाच्या उपक्रमाचे कौतुक आहे. हे केंद्र चोवीस तास सुरू ठेवावे. तसेच, हे केंद्र मातांना पटकन दिसून येईल, अशा ठिकाणी उभे करावे. यासह यातील स्वच्छता आणि या परिसरातील स्वच्छता, देखभाल, दुरूस्ती योग्यरित्या ठेवण्यात यावी. तसेच महिलांसाठी प्रतिक्षालय, स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
हेही वाचा - साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले - मुख्यमंत्री