मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहा पानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार ( Opposition boycotts tea party ) घातला आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विरोधकांना सरकारचा चहा नको, दहशतवाद्यांचे पैसे हवेत, असा गंभीर आरोप ( Atul Londhe on BJP ) ईटीव्ही भारतशी बोलताना केला आहे.
...त्यामुळे चहापान्याच्या कार्यक्रमाला नकार -
राज्य सरकारने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी चहापान कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला विरोधकांनाही निमंत्रण दिले आहे. मात्र दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या सरकारचे चहापान नको म्हणून आम्ही या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपाला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येणारा सरकारचा चहा चालतो, राज्यातल्या जनतेच्या कष्टाच्या पैशातून सरकार चहा देत आहे, तो चहा विरोधक नाकारत आहेत कारण त्यांना चहा नको तर दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या लोकांकडून थेट पैसा घेतलेला चालतो. असा गंभीर आरोप अतुल लोंढे यांनी ईटीव्ही भारतीशी बोलताना केला आहे.
हेही वाचा - ED raid on Sugar cooperative factory : जालनातील सहकारी कारखान्यावर ईडीची धाड