ETV Bharat / city

Attempt to infiltrate Police Commissionerate : मुंबई पोलीस आयुक्तालयात घुसखोरीचा प्रयत्न - मुंबई पोलीस आयुक्तालयात घुसखोरीचा प्रयत्न

पोलीस आयुक्तालयात घुसखोरीचा प्रयत्न करत प्राणघातक शस्त्रांसह घुसखोरीचा केल्याचा प्रकार समोर आला आहे. काल (दि. 7 फेब्रुवारी)रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. दरम्यान, पोलीस मुख्यालयामधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलाआहे. (Mumbai Police Commissionerate) पोलिसांनी अनिल गोरा (37) वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आझाद मैदान पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

Attempt to infiltrate Police Commissionerate
मुंबई पोलीस आयुक्तालयात घुसखोरीचा प्रयत्न
author img

By

Published : Feb 8, 2022, 1:26 PM IST

मुंबई - पोलीस आयुक्तालयात घुसखोरीचा प्रयत्न करत प्राणघातक शस्त्रांसह घुसखोरीचा केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Attempt to infiltrate Police Commissionerate ) काल (दि. 7 फेब्रुवारी)रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. (Attempt to infiltrate Mumbai Police) दरम्यान, पोलीस मुख्यालयामधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आहे. पोलिसांनी अनिल गोरा (37) वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आझाद मैदान पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

व्यक्तीला कार्यालयात जाण्यापूर्वीच ताब्यात घेतले

मुंबईचे पोलीस मुख्यालय असलेल्या आयुक्त कार्यालयात काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास अनिल गोरा (37) नामक संशयित व्यक्ती चाकू आणि बंदुकीच्या आकाराचे लायटर घेऊन मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात घुसत असताना कार्यरत असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे या व्यक्तीला कार्यालयात जाण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे.

एक छोटासा चाकू आणि बंदुकीच्या आकाराचे लायटर जप्त

आझाद मैदानातून पोलीस आयुक्तालयाकडे जाणाऱ्या अनिल गोरा नामक संशयीत व्यक्तीस हा भाईंदर येथील राहणारा असून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक छोटासा चाकू आणि बंदुकीच्या आकाराचे लायटर जप्त केले आहे. त्याच्यावर मुंबई आजाद मैदान पोलीस अवैध शस्त्र बाळगणे प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्याला आज किला कोर्टात हजर करण्यात येणार आहे आता पोलीस तपासाकरिता पोलिस कस्टडी मागण्याची शक्यता आहे.

मुंबई आयुक्त कार्यालयात जाण्यापूर्वी मोठ्याप्रमाणात तपासणी

भाईंदर येथील रहिवासी असलेल्या अनिल गोरा याने हा प्रकार कोणत्या कारणास्तव केला आहे यासंदर्भात अद्यापही मुंबई पोलिसांना कुठलीही माहिती प्राप्त झाली नाही आहे. मुंबई आयुक्त कार्यालयात जाण्यापूर्वी मोठ्याप्रमाणात तपासणी करणे ही जात असतेच मॅटर डिटेक्टर तसेच वैयक्तिक तपासणी देखील करण्यात येते त्यास तपासणी आरोपी जवळ कशाप्रकारे सशस्त्र सापडल्याने त्याला गेटवरच ताब्यात घेण्यात आले मात्र मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

हेही वाचा - देशात कोरोना पसरण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार -नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.