मुंबई - शिवसेना कामगार नेते आमदार सूर्यकांत महाडिक यांच्या निधनामुळे भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या जागी आता शिवसेनेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अरविंद सावंत यांना अनेक वर्षांचा कामगार चळवळीचे अनुभवी मानले जाते. गेली ३५ वर्षे सावंत युनियन क्षेत्रात काम करत आहेत. भाजपसोबतची युती तोडली तेव्हा खासदार अरविंद सावंत यांना त्यांच्याकडील केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचे मंत्रीपद सोडावे लागले होते. महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेने भाजपसोबत युती तोडावी लागली होती. त्यामुळे केंद्रात शिवसेनेचे एकमेव मंत्री असलेले शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर मध्यंतरीच्या काळात त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयकाचे कॅबिनेट मंत्रीपदाच्या दर्जाचे पद देण्यात आले होते. मात्र दुहेरी लाभाचे पद असल्याने त्यांना ते पद देखील सोडावे लागले होते. अखेर शिवसेना नेतृत्वाकडून अरविंद सावंत यांची भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
हेही वाचा - उद्धव ठाकरे यांच्याकडून अजमेरच्या 'ख्वाजा गरीब नवाज' दर्ग्याला चादर