ETV Bharat / city

अरुण गवळीची मुलगी विधानसभा लढवणार; भायखळ्यातून मैदानात - mumbai political news

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या मुलीने आमदार बनण्याचा निर्णय घेतला असून, आज त्या भायखळा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याआधी अरुण गवळी देखील याच मतदारसंघातून विजयी झाले होते.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या मुलीने आमदार बनण्याचा निर्णय घेतला असून, आज त्या भायखळा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत
author img

By

Published : Oct 1, 2019, 2:04 PM IST

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या मुलीने आमदार बनण्याचा निर्णय घेतला असून, आज त्या भायखळा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. गीता गवळी यांच्यासमोर एमआयएमचे वारिस पठाण, समाजवादी पक्षाचे रईस शेख तसेच शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचे आवाहन असणार आहे. याआधी अरुण गवळी देखील याच मतदारसंघातून विजयी झाले होते.

गीता गवळी या अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आहेत. त्यांनी 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता. त्यांना भाजपकडून भायखळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार होती. मात्र, शिवसेना आणि भाजपच्या युतीमुळे ही जागा सेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना देण्यात आली आहे.

या मतदारसंघातून एमआयएमचे वारिस पठाण हे 2014 मध्ये विधानसभेला निवडून आले होते. पठाण यंदाही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पालिकेतील समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख हे देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Intro:मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी हे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या नंतर आता त्यांच्या मुलीने आमदार बनण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्या भायखळा या मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्या समोर एमआयएमचे वारीस पठाण, समाजवादी पक्षाचे रईस शेख, शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचे आवाहन गीता गवळी यांच्या समोर असणार आहे.Body:एकेकाळी मुंबईत मोठ्या प्रमाणात गँगवार होते. त्यावेळी दाऊद, छोटा राजन आणि अरुण गवळी यांची नावे डॉन म्हणून चर्चेत आली. पुढे दाऊद आणि छोटा राजन भारताबाहेर गेले. मात्र अरुण गवळी येथेच राहून आपल्या गँगच्या माध्यमातून कामे करत होते. अरुण गवळी विधानसभा निवडणूक लढवून आमदार झाले. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गीता गवळी यांनी भायखळा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गीता गवळी या अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आहेत. त्यांनी 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला होता.

भाजपाकडून त्यांना भायखळा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली जाणार होती. मात्र शिवसेना आणि भाजपाच्या महायुतीमुळे ही जागा शिवसेनेच्या स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका यामिनी जाधव यांना देण्यात आली आहे. या मतदारसंघातून एमआयएमचे वारीस पठाण हे 2014 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. पठाण यावेळीही निवडणूक लढवत आहेत. समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते रईस शेख हे सुद्धा या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. एमआयएमचे वारीस पठाण, समाजवादी पक्षाचे रईस शेख, शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचे आवाहन गीता गवळी यांच्या समोर असणार आहे. या निवडणुकीत गीता गवळी यांना छुपी साथ लाभू शकते अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.