ETV Bharat / city

मुंबईत ७० हजार प्रवांशांची कोरोना चाचणी; ८३ संशयितांपैकी ७५ निगेटिव्ह तर ७ जण अजूनही देखरेखीत

मुंबईत आत्तापर्यंत सुमारे 70 हजार प्रवाशांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील 83 संशयित रुग्णांपैकी तपासणीअंती 75 जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर, 7 जणांना सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी
मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी
author img

By

Published : Mar 6, 2020, 6:47 AM IST

Updated : Mar 6, 2020, 6:53 AM IST

मुंबई - भारतात कोरोनाचे 30 रुग्ण आढळल्याने देशभरातील सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. शहरात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या लक्षात घेता पालिका प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालिकेत आढावा बैठक घेण्यात आली. सद्या परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करून संशयितांना देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे.

  • BMC Commissioner Praveen Pardeshi: During monitoring of ships, 1 suspect was found but tested negative. Around 18,000 int'l passengers come to Mumbai daily. To screen them around 100 doctors are needed, BMC has provided them 50 of its own doctors besides those from pvt hospitals. https://t.co/jph2jQj0wy

    — ANI (@ANI) March 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबईत येणाऱ्या जहाजांची पडताळणी करताना कोरोनाचा एक संशयित आढळून आला होता. मात्र, तपासणीअंती त्याच्या रिपोर्ट निगेटीव्ह आल्या आहेत. मुंबईत दररोज सुमारे 18 हजार प्रवासी बाहेरून येतात. त्यांची तपासणी करण्यासाठी जवळपास 100 डॉक्टरांची गरज आहे. पालिकेने या ठिकाणी खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांव्यतिरिक्त स्वत: चे 50 डॉक्टर उपलब्ध करून दिले आहेत. अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली.

हेही वाचा - येस बँकेवरील निर्बंधामुळे ग्राहक अडचणीत

मुंबईत आत्तापर्यंत सुमारे 70 हजार प्रवाशांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील 83 संशयित रुग्णांपैकी तपासणीअंती 75 जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर, 7 जणांना सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यासोबतच कोरोनाबाबतच्या जागरुकतेसाठी राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालिकेत आढावा बैठक घेण्यात आली. मुंबईतील खासगी रुग्णालये, अ‌ॅड एजन्सी आणि थिएटर मालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकित लोकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला, असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा - 'राज्यात कुठेही डिटेन्शन कॅम्प उभारले जात नाहीत'

Last Updated : Mar 6, 2020, 6:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.