ETV Bharat / city

CM Eknath Shinde : मराठी माणसाबाबत आता साक्षात्कार; अनिल परब यांचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला - Anil Parabs prank on real shivsena

ते खंदे आहेत की मिंदे आहेत हे लोकांनी ठरवायचं आहे त्यामुळे आम्ही आवाहन केले राजीनामा देऊन त्यांनी इलेक्शनला सामोरे जावे. मराठी माणूस बाहेर गेला हा साक्षात्कार त्यांना आता झाला आहे, असे अनिल परब मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. मुंबईतून मराठी माणूस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांच्यामुळे बाहेर फेकला गेला असं सातत्याने आरोप बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत.

Anil Parab
अनिल परब
author img

By

Published : Sep 22, 2022, 4:56 PM IST

मुंबई : मुंबईतून मराठी माणूस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांच्यामुळे बाहेर फेकला गेला असं सातत्याने आरोप बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. शिवसेनेचे नेते अनिल परब ( Shiv Sena leader Anil Parab ) यांनी या आरोपांना सडेतोड उत्तर देताना, शिंदेंना मराठी माणसाबाबत आता साक्षात्कार झाला आहे, असा खोचक टोला अनिल परब यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.

मिंदे नव्हे तर बाळासाहेबांचे खंदे : बंडखोरी करत राज्यात सत्तांतर केल्याने शिवसेना आणि शिंदे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आरोपांचा भडिमार सुरू आहे. नुकताच मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेल्याचे सांगत ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच आम्ही मिंदे नव्हे तर बाळासाहेबांचे खंदे असल्याचे म्हटले. शिवसेनेचे नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

इलेक्शनला सामोरे जावे असा इशारा : एकनाथ शिंदे यांना मराठी माणसाबाबत आता मुख्यमंत्री झाल्यानंतर साक्षात्कार झाला आहे. यापूर्वी कुठे होते असा सवाल परब यांनी उपस्थित केला. खरी शिवसेना कोणाची हा वाद न्यायप्रविष्ट आहे. मात्र शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला जातोय यावर देखील परब यांनी भाष्य केले. खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याचे अधिकार ना निवडणूक आयोग, ना भाजपला ठरवायचा आहेत. न्यायालय यावर निर्णय देणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीचा तळागाळातील शिवसैनिकांना एकही ओरखडा बसलेला नाही. शिवसेनेच्या गटनेत्यांच्या मेळाव्यात खरी शिवसेना काय आणि कोणती हे गर्दीतून दिसून आले, असे परब म्हणाले. मात्र ते खंदे आहेत की मिंदे आहेत, हे लोकांनी ठरवायचे आहे. त्यामुळे आम्ही आव्हान करतोय, राजीनामा देऊन त्यांनी इलेक्शनला सामोरे जावे असा इशारा परब यांनी दिला.

न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना भूमिका स्पष्ट करेल : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेऊ, अशी भूमिका स्पष्ट केली. मात्र दुसऱ्याच दिवशी मुंबई महापालिकेने शिवतीर्थावरील मेळाव्याला परवानगी देण्यास कायदा व सुव्यवस्थेचा कारण पुढे करत नकार दिला. शिवसेनेने याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने त्यावर सुधारित याचिका दाखल करण्यास वेळ दिला आहे. अर्जदार कोण आहेत, कोण नाही हे उद्या कोर्टासमोर स्पष्ट होईल. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कला न्यायालय परवानगी देईल, असा विश्वास असल्याचे परब यांनी सांगितले. मात्र, भाजपकडून शिंदे गटाला परवानगी मिळेल, असे सांगण्यात येत आहे. परब यांनी यावरून जोरदार टीकास्त्र सोडले. युक्तिवाद भाजप समोर नाहीतर कोर्टासमोर होणार आहे, असेही ते म्हणाले. तसेच 1966 पासून कधीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आलेला नाही. त्यामुळे सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असे परब यांनी सांगितले. न्यायालयाने परवानगी न दिल्यास शिवसेनेची भूमिका काय यावर कायद्याचा निकाल काय लागतो हे तपासून बघू त्यानंतर शिवसेना आपला निर्णय घ्यायला मोकळी असल्याचे परब यांनी म्हटले. मनसेचेही परब यांनी चांगलीच धुलाई केली. मनसे केवळ इशारा देता येतो, पुढे काहीच करत नाही, असा टोला लगावला.

सोमयानविरोधात अब्रू नुकसानीचा दावा : दापोलीतील साई रिसॉर्ट तोडण्याचे आदेश आहेत यावर अनिल परब यांनी खुलासा केला. या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. ईडीने चौकशी केली आहे, त्याचे रिपोर्ट समोर आले आहेत आणि हे सगळं सत्य आहे. न्यायालयाचे आदेश देतील त्या आदेशाचा आम्ही पालन करू. ज्यांच्या या रिसॉर्टशी संबंध आहे ते बघून घेतील काय करायचे ते. मात्र किरीट सोमय्या केवळ बदनामीसाठी आरोप करत होते. त्यामुळे सोमय्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला असून आम्ही कवडीची किंमत देत नाही, असे परब म्हणाले.

पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न : कोणतीही पोटनिवडणूक बिनविरोध होते. अंधेरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही बिनविरोध होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू. विरोधकांना आवाहन देखील करू. मात्र निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यास शिवसेना तयार आहे, असे परब म्हणाले. अंधेरीची पोटनिवडणूक लढवण्याबाबत भाजपा आग्रही आहे. भाजपकडून उमेदवार देखील जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यास निवडणूक होते, की बिनविरोध हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल : अर्जदार कोण अर्जदार कोण नाही हे उद्या कोर्टाच्या समोर जातील. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क परवानगी देईल. युक्तिवाद भाजप समोर नाहीतर कोर्टासमोर होणार आहे. 1966 पासून कधीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आलेला नाही. सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल. आम्ही परवानगी मागितली आणि ती मिळेल, असा आमचा विश्वास आहे. मनसेला केवळ इशारा देता येतो. तळागाळातील शिवसैनिकांना एकही ओरखडा बसलेला नाही हे कालच्या गर्दीने सिद्ध झालेला आहे.आमच्या लक्ष कामाकडे आहे, की मुंबईकडे आहे. ही राजकीय लढाई आहे, आणि ती सुरू राहणारच असे अनिल परब म्हणाले.

यंत्रणेच्या आदेशाचे पालन करू : दापोली रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. ईडीने चौकशी केली आहे, त्याचे रिपोर्ट समोर आले आहेत आणि हे सगळं सत्य आहे. यंत्रणा जे आदेश देतील त्या आदेशाचे आम्ही पालन करू ज्यांच्या रिसॉर्टशी संबंध आहे ते बघून घेतील काय करायचे ते, किरीट सोमय्या केवळ बदनामी साठी आरोप करत होते. सोमय्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केलेला आहे. सोमय्यांना आम्ही किंमत देत नाही.

अंधेरी पोटनिवडणूकीबाबत अनिल परब यांचे म्हणणे : कोणतीही पोटनिवडणूक बिनविरोध होते आम्हीही त्यासाठी आव्हान करू. मात्र निवडणूक लढाईची झाली तर आम्ही शिवसेना तयार आहे. असे अंधेरी पोटनिवडणूकीबाबत अनिल परब म्हणाले. खरी शिवसेना काय आहे इलेक्शन कमिशनरला आणि पक्षांना ठरवायचं नाहीये तर कोर्टाला ठरवायचं आहे खरी शिवसेना काय आहे. कालच्या मेळाव्यात दिसून आली. कायद्याचा निकाल काय लागतो हे तपासून बघू त्यानंतर शिवसेना आपला निर्णय घ्यायला मोकळी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.