मुंबई - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील मनी लाँडरिंग प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याची तळोजा कारागृहात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या चौकशीमध्ये सचिन वाझे यांनी मोठे खुलासे केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील अॅड.कमलेश घुमरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सचिन वाझे यांचे आरोप खोटे असून ईडी आणि सीबीआयच्या तपासावर शंका व्यक्त केली आहे. तसेच सचिन वाझे यांनी चांदिवाल आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात फक्त जानेवारी महिन्यात एकदाच अनिल देशमुख यांना भेटल्याचे सांगत आहे. तसेच सचिन वाझे यांनी बार मालकांकडून घेतलेले ४ कोटी ७० लाख रुपयांबाबत काही बोललेले नाही. त्यामुळे ईडी-सीबीआयच्या तपासावर शंका येत असल्याचे अॅड.कमलेश घुमरे यांनी सांगितले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित शंभर कोटी वसुलीचे आरोप केले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुखावर झालेल्या आरोपांचा तपास सध्या ईडीकडून ही सुरु आहे. याबरोबरच सीबीआयने न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परवीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली आहे. या चौकशी दरम्यान देशमुख यांचे स्वीय सहायक, तुरुंगात असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच बरोबर काही हॉटेल आणि बार मालकांची ही चौकशी करण्यात आली आहे. याचौकशीत काही बार मालकांनी सचिन वाझे यांना पैसे देण्यात आले होते. हे पैसे सचिन वाझे एक नंबरला देणार आहे. मात्र, हा एक नंबर कोन याचा खुलासा ईडीच्या अधिकाऱ्यांना होत नव्हता. त्याचाही खुलासा सचिन वाझे याच्या जबाबात दिला आहे. ज्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच असल्याचे माहिती चर्चिली जात होती. यापार्श्वभूमीवर आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील अॅड.कमलेश घुमरे यांनी खुलासा केला आहे. सचिन वाझे यांचे आरोप खोटे असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले आहे. तसेच पैसे घेणारे अनिल देशमुख नाही, तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग असावेत, अशी माहिती घुमरे यांनी दिली आहे.
सचिन वाझेवर दबाव -
अॅड.कमलेश घुमरे यांनी सांगितले की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या १०० कोटी रुपयांचे वसुलीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाची स्थापना केली होती. या चौकशी आयोगासमोर सचिन वाझे याने आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्या प्रतिज्ञापत्रात फक्त सचिन वाझे जानेवारी महिन्यात एकदाच अनिल देशमुख यांना भेटल्याचे सांगत आहे. तसेच सचिन वाझे यांनी बार मालकांकडून घेतलेले ४ कोटी ७० लाख रुपयांबाबत काही बोललेले नाही. ईडी आणि सीबीआय जेव्हा जबाब घेतात तेव्हा त्यांचा माणूस तिथे असते. मात्र, आयोगासमोर मोकळ्या वातावरणात प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामुळे सचिन वाझे यांनी दिलेला जबाब हा दबावाखालीच असावा असेही घुमरे म्हणाले आहे.
देशमुखांवरील आरोप खोटे -
सचिन वाझे यांनी चांदिवाल आयोगा समोर काही ठोस उत्तर दिले नाहीत. फक्त एकदा जानेवारी अनिल देशमुख्याना भेटल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या आरोप खोट असल्याचे किंवा दबावात असल्याचे निदर्शनात येत आहे. बारवाल्यांनी 4 कोटी रुपये सचिन वाझे यांना दिले आहे. मात्र, ते पैसे अनिल देशमुख यांना दिले का? माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना दिले? याबाबाद सुद्धा उत्तर मिळालेले नाही. विशेष म्हणजे सचिन वाझे सीबीआयला आणि ईडीला वेगळा जबाब देण्यात येत आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या आरोपात तथ्य दिसून येत नाही. सचिन वाझे वसुलीसाठी मुंबईतल्या 1750 बारची संख्या सांगत असल्याचे चर्चिले जातेय. तर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग 200 बार सांगतात. त्यामुळे सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांच्या आरोपात तथ्य दिसून येत नाही असेही अॅड. कमलेश घुमरे यांनी सांगितले आहे.