ETV Bharat / city

Chandiwal Commission : परमबीर सिंह थरथर कापत होते, चांदिवाल आयोगासमोर अनिल देशमुख यांचा दावा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर ठेवलेल्या स्फोटकांबाबतची माहिती राज्य सरकारपासून का दडवून ठेवली, असे विचारल्यास तत्कालिक पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Param bir Singh ) हे थरथर काप होते, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी केला आहे. ते चांदिवाल आयोगासमोर ( Chandiwal Commission ) बोलत होते. सचिन वाझे ( Sachin Waze ) यांचे वकील आज देशमुख यांची उलट तपासणी करणार होते. मात्र, ते आज गैरहजर असल्याने उलट तपासणी झाली नाही.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jan 20, 2022, 7:29 PM IST

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे 100 कोटी कथित वसुली प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Param bir Singh ) यांनी आरोप लावल्यानंतर राज्य सरकारकडून गठीत केलेल्या चांदिवाल आयोगासमोर ( Chandiwal Commission ) माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांची उलट तपासणी सचिन वाझे यांच्या वकिलांकडून करण्यात आली. त्यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ ठेवलेल्या स्फोटकांबाबतची माहिती राज्य सरकारपासून का दडवून ठेवली, असे मी आणि तीन अतिरिक्त मुख्य सचिवांनी विचारले तेव्हा पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंह थरथर कापत होते, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी बुधवारी (दि. १९ जानेवारी) केला होता. आज पुन्हा अनिल देशमुख यांची उलट तपासणी होणार होती. मात्र, सचिन वाझे ( Sachin Waze ) यांचे वकील काही कारणास्तव गैरहजर राहिल्याने गुरुवारी (दि. २० जानेवारी) चांदीवाल आयोगाचे कामकाज होऊ शकले नाही.

परमबीर सिंह भीतीने थरथरत होते - उद्योगपती अंबानी यांच्या अँटीलिया निवासस्थानाबाहेर काही महिन्यांपूर्वी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. राज्याच्या गृहविभागाने याप्रकरणाची चौकशी केली होती. याच प्रकरणात सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. आता सचिन वाझेच्या वकिलांनी चांदीवाल आयोगासमोर देशमुखांची उलटतपासणी केली आहे. त्यांना अँटीलिया प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आले असता देशमुख म्हणाले, अँटिलिया बॉम्ब प्रकरणात परमबीर सिंह यांना 3 अतिरिक्त मुख्य सचिवांच्या उपस्थितीत चौकशीसाठी बोलावले. त्यावेळी परमबीर सिंह भीतीने थरथरत होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी हे प्रकरण एटीएसकडे वर्ग करण्याची सूचना केली. पण, परमबीर सिंह यांनी त्यावर आक्षेप घेत मुंबई पोलिसांच्या हाती तपास सोपवण्याची मागणी केली. त्यानंतर 6 मार्च, 2021 ला हे प्रकरण एटीएसकडे सोपवण्यात आले. तसेच सचिन वाझेला निलंबित केले, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.

वाझे यांचा सभागृहात बचाव करण्याचा प्रश्नच नाही - पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक केली म्हणून वाझेवर अँटिलियाप्रकरणी खोटे आरोप लावण्यात आले होते, असे आपण विधानसभेत सांगितले होते का, असा प्रश्न वकिलांनी केला होता. त्यानंतर देशमुख म्हणाले, मी वाझे यांचा सभागृहात बचाव करण्याचा प्रश्नच नाही. अँटिलिया प्रकरणात विरोधी पक्षनेत्यांनी काही मुद्दे उपस्थित केले तेव्हा मी विस्ताराने माहिती घेऊन सभागृहात उद्या सांगेन एवढेच म्हणालो होतो, असे देशमुख म्हणाले.

चांदिवाल आयोगाची स्थापना - अँटीलिया प्रकरणानंतर परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालिन गृहमंत्री देशमुख यांंनी 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. तसेच राज्यातील पोलीस भरतीसाठी भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोपही देशमुखांवर करण्यात आला. पोलिसांच्या मदतीने खंडणीचे रॅकेट चालवत असल्याच्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी चांदिवाल आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली आहे. आतापर्यंत देशमुख यांच्या वकिलांनी चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेची उलटतपासणी केली होती. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या.

आजची सुनावणी तहकूब - आज (गुरुवार) चांदीवाल आयोगात अनिल देशमुख यांची उलट तपासणी होणार होती. परंतु आज सचिन वाझे यांचे वकील एॅड नायडू काही कारणास्तव गैरहजर राहिल्याने आजची सुनावणी तहकूब करण्यात आली. त्यामुळे उद्या पुन्हा आयोग सुनावणी करणार आहे. चांदीवाल आयोगाच्या सुनवणीचे उद्या अंतिम दिवस असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.