ETV Bharat / city

Anil Deshmukh Judicial Custody Extended : अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम वाढला - मनी लॉन्ड्रिंग

100 कोटी कथित वसुली प्रकरणात ( 100 crore recovery case ) अनिल देशमुख यांना 13 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढवण्यात ( Anil Deshmukh Judicial Custody Extended ) आली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणात अटक ( Anil Deshmukh Money laundering case ) केली होती.

Anil Deshmukh
अनिल देशमुख
author img

By

Published : Apr 29, 2022, 2:01 PM IST

मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणात ( 100 crore recovery case ) अनिल देशमुख यांना 13 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढवण्यात ( Anil Deshmukh Judicial Custody Extended ) आली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणात अटक ( Anil Deshmukh Money laundering case ) केली होती.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर पंधरा दिवस कस्टडीत ठेवले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तेव्हापासून अनिल देशमुख हे आर्थर रोड जेलमध्ये ( Arthur Road Prison ) न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांनी जामीन मिळवण्याकरिता मुंबई सत्र न्यायालयात देखील अर्ज केला होता मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर एप्रिल महिन्यात ईडीने उत्तर सादर केले असून अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. अनिल देशमुख यांना कथित वसुली प्रकरणात मुख्य आरोपी दाखवण्यात आले आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला असल्याचे देखील ईडीने उत्तरात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परंबिर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा टारगेट दिला होता, असे खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केले होते. यानंतर निलंबित API सचिन वाझे यांच्यावर या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खाजगी सहसचिव कुंदन शिंदे यांनाही या प्रकरणात सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा - Hanuman Chalisa Row : राणा दाम्पत्याचा फैसला टळला, वेळ नसल्याने न्यायालय उद्या घेणार सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.