ETV Bharat / city

मुंबईच्या 'लाईफलाईन’समोर प्रवासी नतमस्तक; आनंद महिंद्रांनी केले ट्विट - मुंबई लोकल ट्रेन न्यूज

लोकल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत सुरू झाल्यामुळे प्रवाशांमधून आनंद व्यक्त होत आहे. दरम्यान, लोकल सुरू झाल्यानंतर मुंबईतील एका प्रवाशाने चक्क रेल्वेत बसण्यापूर्वी लोकलच्या दारावर डोके टेकवत आपल्या लाईफलाईनसमोर नतमस्तक झाला.

anand mahindra tweet
आनंद महिंद्रांनी केला फोटो ट्विट
author img

By

Published : Feb 3, 2021, 10:17 PM IST

Updated : Feb 3, 2021, 10:24 PM IST

मुंबई - लॉकडाऊन दरम्यान बंद असलेली मुंबईची लोकल आता 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. लोकल सेवा ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते. त्यामुळे लोकल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत सुरू झाल्यामुळे प्रवाशांमधून आनंद व्यक्त होत आहे. दरम्यान, लोकल सुरू झाल्यानंतर मुंबईतील एका प्रवाशाने चक्क रेल्वेत बसण्यापूर्वी लोकलच्या दारावर डोके टेकवत आपल्या लाईफलाईनसमोर नतमस्तक झाला. हा फोटो उद्योगपती आनंद महिंद्रा यांना भावला असून, त्यांनी तो फोटो ट्विट केला आहे.

anand mahindra tweet
आनंद महिंद्रांनी केला फोटो ट्विट

हेही वाचा - मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प फसवा, भाजपची टीका

लाईफलाईनसमोर प्रवासी नतमस्तक

लोकलची ओळख मुंबईकरांची लाईफलाईन अशी आहे. या लोकल रेल्वेसोबत मुंबईकरांच एक वेगळेच भावनिक नाते आहे. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सेवा १ फेब्रुवारीला सुरू झाली. यावेळी एका प्रवाशाने लोकलच्या दारावर डोके टेकवत नतमस्तक झाला. लोकलसमोर नतमस्तक झालेल्या प्रवाशाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

1 फेब्रुवारीपासून लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू

मुंबईमध्ये गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे दहा महिन्यांपासून मुंबईची लोकल रेल्वे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी बंद होती. मात्र, आता मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरू झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढण्याआधी लोकलमधून दररोज 70 लाख प्रवासी प्रवास करत होते. मात्र, रेल्वेमध्ये होणारी गर्दी, पाळता न येणारे सोशल डिस्टन्सिंग याचा विचार करता, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात लोकल रेल्वे पूर्णत: बंद करण्यात आली होती.

हेही वाचा - गुजराती मतदारांसाठी जलेबी-फाफडानंतर आता शिवसेनेचा रासगरबा

Last Updated : Feb 3, 2021, 10:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.