ETV Bharat / city

पित्याकडून स्वतःच्या मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न, बायको माहेरावरून परत येत नसल्याने उचलल पाऊल - मुंबई पोलीस

मुंबई - वारंवार विनंती करूनही पत्नी घरी परत येत नसल्याने, पतीने स्वत:च्या मुलीला फासावर लटकवल्याचा धक्कादायक प्रकार मालाडच्या कुरार परिसरात घडला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी अजय गौड याला अटक केली आहे.

मुंबई - कुरार पोलिसांकडून संबंधीत गुन्ह्यातील व्यक्तीला अटक

author img

By

Published : Aug 10, 2021, 5:17 PM IST

मुंबई - पत्नी माहेरी निघून गेली आणि वारंवार विनंती करूनही ती घरी परत येत नसल्याने, पतीने स्वत:च्या मुलीला फासावर लटकवल्याचा धक्कादायक प्रकार मालाडच्या कुरार परिसरात घडला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी अजय गौड याला अटक केली आहे. दरम्यान, दोन मुलांची त्याच्यापासून सुटकाही केली आहे. अजय गौड हा व्यसनी आहे. त्यातच तो पत्नी आणि दोन मुलांना बेदम मारहाण करायचा.

पित्याकडून स्वतःच्या मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न, कुरार परिसरातील घटना, त्याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वसंत वेले

मुलांना मारहाण करण्यास सुरुवात

अजय गौड याच्या व्यसनाला कंटाळून पत्नी दोन वर्षांपूर्वी दोन्ही मुलांना घेऊन उत्तर प्रदेश येथील गावी निघून गेली. मात्र, अजयने काही दिवसांपूर्वी आपली मुलगी आणि आठ वर्षांच्या मुलाला मुंबईत परत आणले. त्यानंतर त्याने नशेत आपल्या मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, अजय याचा भाऊ सुचितने या प्रकरणी कुरार पोलिसांना तक्रार दिली होती.

आपल्या मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न

आपल्या मुलीला अजयने प्लास्टिकच्या बादलीवर उभे करत, तिच्या गळ्यात ओढणीने फास टाकत पंख्याला लटकवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीला तो पाया खालील बादली हटविण्यास सांगत होता. ज्याला तिने नकार दिल्यावर त्याने पंखा सुरू करण्याची धमकी दिली. यावेळी मुलगी घाबरून ओरडू लागली. दरम्यान, मुलीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घरी धाव घेत अजयला या कृत्यापासून अडवले.

कुरार पोलिसांनी केली सुटका

कुरार पोलिसांनी अजयला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून दोन मुलांची सुटका केली आहे. याबाबतची माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेले यांनी दिली. अजय गौड याने मुलालाही जमिनीवर झोपवून त्याच्या अंगावर सफेद चादर टाकत दोन्ही मुलांचे फोटो काढले व पत्नीला पाठवले. मुलगा मेला आणि मुलगी गळफास घेत असल्याचे चित्र निर्माण करून, पत्नीला घाबरवून तु लवकर मुंबईत परत ये, अशी धमकी दिली.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.