ETV Bharat / city

Mumbai Police return gold : आश्यर्यकारक! 22 वर्षांनी चोरीला गेलेले सोने पोलिसांनी केले परत - Mumbai Police gold

आपली एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेल्यास ती परत मिळवण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. बऱ्याचदा कंटाळून ती वस्तू परत मिळण्याची आशाही आपण सोडून देतो. (Mumbai Police return gold) मात्र, उशिरा का होईना चोरीला गेलेली वस्तू एक नाही दोन नाही तब्बल 22 वर्षांनी पुन्हा मिळाली आहे. शुक्रवारी मुंबई पोलिसांनी हे सोने संबंधितांना परत केले आहे.

22 वर्षांनी चोरीला गेलेले सोने पोलिसांनी केले परत

author img

By

Published : Jan 30, 2022, 12:20 AM IST

मुंबई - आपली एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेल्यास ती परत मिळवण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. बऱ्याचदा कंटाळून ती वस्तू परत मिळण्याची आशाही आपण सोडून देतो. (Mumbai Police gold Case) मात्र, उशिरा का होईना चोरीला गेलेली वस्तू एक नाही दोन नाही तब्बल 22 वर्षांनी पुन्हा मिळाली तर धक्का बसेल ना? होय हा सुखद धक्का फॅशन ब्रॅन्ड चिरागउद्दीच्या मालकाला बसला आहे. तब्बल 22 वर्षाआधी चोरी गेलेले सोने शुक्रवारी पोलिसांनी त्यांना परत केले आहे. (Mumbai Police return gold after 22 years) सध्या या सोन्याची किंमत दीड कोटी रूपये इतकी आहे.

प्रतिक्रिया

1998 मध्येच गॅंगमधील चार आरोपींना पकडण्यात आले

8 मे 1998 मध्ये कुलाबातील अर्जून दस्वानीच्या घरी एका गॅंगने सोन्याची चोरी केली होती. आरोपींनी सिक्युरिटी गार्डला मारहाण केली आणि सेफच्या चाव्या हिसकावून घेतल्या होत्या. यानंतर गॅंगने दस्वानी आणि त्यांच्या पत्नीला बांधले आणि मग चोरी केली. 1998 मध्येच गॅंगमधील चार आरोपींना पकडण्यात आले होते आणि त्यांच्याकडून चोरी केलेल्या काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. ट्रायलनंतर 1999 मध्ये चौघांना सोडून देण्यात आले. या प्रकरणात दोन आरोपी अजूनही फरार आहेत. 2002 मध्ये जो पर्यंत इतर दोन आरोपी मिळत नाही तो पर्यंत मुद्देमाल द्यायचा नाही असे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले.

अमेरिकेत राहणाऱ्या दोन्ही बहिणींनी आधीच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिले

न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना (2007)मध्ये अर्जन दस्वानी यांचं निधन झाले. त्यानंतर दस्वानी कुटुंबियांचेही याकडे दुर्लक्ष झाले. दरम्यान, (2021)मध्ये मुंबई पोलिसांनी अनेक वर्षांपासून जप्त असलेल्या वस्तू तक्रारदारांना परत करण्यासंदर्भात न्यायालयात पाठ पुरावा केला. न्यायालयाने परवानगी दिल्याानंतर पोलिसांनी राजू दस्वानी यांच्याशी पत्रव्यवहार केला. दस्वानींचे वकिल सुनिल पांडे म्हणाले की, कोर्टाचा हा आदेश ऐकून परिवाराला आनंद झाला. चोरी झालेल्या वस्तू त्यांच्या पूर्वजांच्या आहेत. परिवारातील सदस्यांचा भावना या वस्तूंसोबत जुळल्या आहेत. राजू दस्वानी आणि त्यांच्या दोन बहिणी या संपत्तीच्या कायदेशीर वारस आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या दोन्ही बहिणींनी आधीच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिले आहे. दरम्यान, पोलिसांनी दस्वानी कुटुंबियांना त्याचे मौल्यवान दागिने परत केले आहेत.

हेही वाचा - मुंबईचे पेंग्विन विरुद्ध अहमदाबादचे पेंग्विन राजकीय सामना रंगणार.. महापौर पेडणेकर अहमदाबादच्या दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.