ETV Bharat / city

मुसळधार पावसामुळे उच्च न्यायालयातील सर्व सुनावणी रद्द - due to heavy rain mumbai hc not conducting any hearing

सुशांतसिंह आत्महत्या संदर्भात नागपूरमधील व्यावसायिक समित ठक्कर या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालायत याचिका दाखल केली असून या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. या याचिकेत याचिकाकर्त्यांनी सुशांतसिंह संदर्भात मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचे म्हणत या संदर्भात एका एसआयटीची स्थापना करावी किंवा या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

all hearing of mumbai high court cancelled today for heavy rain

author img

By

Published : Aug 4, 2020, 1:07 PM IST

मुंबई - महानगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या जनजीवनाला बसला आहे. मंगळवारी मुंबईतील वेगवेगळ्या परिसरांमध्ये पाणी साठल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आजच्या सर्व याचिकांवरील सुनावणी ही रद्द करण्यात आलेली आहे.

सुशांतसिंह संदर्भात होऊ शकली नाही सुनावणी

सुशांतसिंह आत्महत्या संदर्भात नागपूरमधील व्यावसायिक समित ठक्कर या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालायत याचिका दाखल केली असून या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. या याचिकेत याचिकाकर्त्यांनी सुशांतसिंह संदर्भात मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचे म्हणत या संदर्भात एका एसआयटीची स्थापना करावी किंवा या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी केली आहे. मात्र, मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे उच्च न्यायालयात कुठल्याही याचिकेवर सुनावणी न झाल्याने बुधवारी या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास केला जात असताना सुशांतसिंहचे वडील केके सिंग यांनी बिहार पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर बिहार पोलिसांचे एक पथक मुंबई तपासासाठी दाखल झालेल आहे. यानंतर मुंबई पोलिसांच्या विरोधात वेगवेगळ्या गोष्टींवरून टीका होत असताना सुशांतसिंह राजपूत त्याच्या वडिलांनी नुकतेच जाहीर केलेल्या एका स्टेटमेंटवरून त्यांनी 25 फेब्रुवारीला मुंबई पोलिसांकडे सुशांतसिंह यासंदर्भात तक्रार केले असल्याचे म्हटले आहे. मात्र, या गोष्टीचे खंडन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेला आहे.

सुशांतसिंह याचा मेव्हणा आयपीएस अधिकारी ओ पी सिंग यांनी मुंबई पोलिसांच्या झोन 9 च्या डिसीपीना सुशांतसिंहच्या संदर्भात काही माहिती मिळाली होती. मात्र या संदर्भात स्वतः झोन 9 च्या डिसीपीनी ओ पी सिंग यांना संपर्क साधून या प्रकरणी स्वतः येऊन लेखी तक्रार केल्या शिवाय सुशांत सिंग संदर्भात कुठलीही कारवाई करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र हे प्रकरण अनौपचारिक पद्धतीने सोडविण्यात यावे, असे ओपी सिंग यांचे म्हणणे होते. ज्यास मुंबई पोलिसांच्या डिसीपी झोन 9 ने स्पष्ट नकार दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.