मुंबई - केंद्र सरकारने कसा अर्थसंकल्प सादर करावा हा केंद्र सरकारचा अधिकार आहे. केंद्र सरकारचा बजेट सादर झाल्यानंतर देशभरातील राज्य आपला अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ( Ajit Pawar on Union budget ) दिली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
नवीन आर्थिक वर्षाकरिता राज्य सरकार 11 मार्चला अर्थसंकल्प ( MH budget on 11th March ) सादर करणार आहे. त्याबाबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, की महाराष्ट्र सरकार आपले बजेट मांडेल. कोरोनामुळे आलेल्या अडचणीतून अजूनही राज्य सरकार ( Ajit Pawar on MH economy ) सावरलेले नाही. राज्याच्या आर्थिक उत्पन्नाचा अंदाज घेतला गेला होता. त्याप्रमाणे अद्यापही राज्याला आर्थिक उत्पन्न आलेले नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील आपण चर्चा करणार ( MH finanace Minister on Budget ) आहोत. केंद्र सरकारचा बजेट पाहून राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या घटली, १३८४ नव्या रुग्णांची नोंद, १२ जणांचा मृत्यू
दुकानांमधून वाईन विक्रीला परवानगी
कोरोना महामारीचा राज्याचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत राज्याचा अर्थसंकल्प कशा पद्धतीने सादरीकरण केला जाणार आहे, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने सुपर मार्केट आणि दुकानांमधून वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. राज्यात आता सुपर मार्केट ( wine sale in super markets in Maharashtra ), वॉक इन स्टोअर्स, आणि एक हजार चौरस फुटांपेक्षा मोठ्या असलेल्या कोणत्याही जनरल स्टोअर्समध्ये ( Wine sale permission in shops in Maharashtra ) वाईन मिळणे सहज शक्य होणार आहे.