मुंबई - बीकेसीतील ट्रायडेंट हॉटेलच्या बाहेर अजितदादा समर्थकांकडून 'अजित दादा वुई लव्ह यु' चे बॅनर झळकवण्यात आले.
महाविकास आघाडीच्या बैठकी आधी दादांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. बीकेसीतील ट्रायडेंट हॉटेलच्या बाहेर या प्रकारचे फलक लावण्यात आले.
या ठिकाणी महाआघाडी च्या प्रमुख नेत्यांची व आमदारांची संयुक्त बैठक चालू असून, लवकरच अजित पवार महाविकास आघाडीत सामील झाल्याचे पाहायला मिळतील असे चित्र आहे. तसेच या संयुक्त बैठकीला अजित दादा उपस्थित राहतील असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.