ETV Bharat / city

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट, लस घेतल्यावरही होणार कोरोना - डॉ. राहुल पंडित

लोकसंख्येची घनता, डायबेटीज-हायपरटेन्शनचे रुग्ण, उन्हाचा चटका आणि लोकांचा बेधडकपणा या कारणांमुळे महाराष्ट्रात कोरोना पेशंट वाढले असून २०२४ पर्यंत कोरोना महाराष्ट्रातून जाणार नाही, असे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

dr rahul pandit
डॉ. राहुल पंडित यांची मुलाखत
author img

By

Published : Mar 13, 2021, 10:10 PM IST

Updated : Mar 14, 2021, 7:42 PM IST

मुंबई - मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा बऱ्याच जणांचा याची लागण झाली होती. आता पुन्हा येथे रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. अशा शहरांमध्ये कोरोनाची दुसरी लाट असल्याचे म्हणता येईल, अशी माहिती फोर्टीस हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअरचे डायरेक्टर आणि महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिली आहे. लोकसंख्येची घनता, डायबेटीज-हायपरटेन्शनचे रुग्ण, उन्हाचा चटका आणि लोकांचा बेधडकपणा या कारणांमुळे महाराष्ट्रात कोरोना पेशंट वाढले असून २०२४ पर्यंत कोरोना महाराष्ट्रातून जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. राहुल पंडित यांच्यासोबत बातचीत

यासंदर्भात बोलताना डॉ. राहुल पंडित म्हणाले, की महाराष्ट्रातील शहरांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. शहरांमधील रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. पण ग्रामीण भागांमध्ये पहिलीच लाट संपलेली नाही. तेथे पहिल्या लाटेतील कोरोनाने मान वर काढली आहे. जगभरात कोरोना व्हायरसचे सुमारे तीन हजारपेक्षा जास्त म्युटेशन आढळून आले आहेत. अकोला, अमरावती या पट्ट्यात अचानक रुग्ण वाढले. त्यामागे म्युटंट स्ट्रेन असल्याचे वाटते. यासंदर्भात अजून कोणताही अहवाल आलेला नाही. पण असे म्हणायला हरकत नाही.

लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनावर मात

लसीकरणाची गती वाढवण्याची नितांत गरज आहे. लसीकरणानंतर लोकांच्या शरीरात कोरोनाला प्रतिरोध करण्याची क्षमता निर्माण होईल. या दरम्यान, कोरोना झालेल्या लोकांच्या शरीरात अॅंटिबॉडिज विकसित होतील. यातून हर्ड इम्युनिटी गाठता येईल. हर्ड इम्युनिटीच्या बळावर पोलियो, स्मॉलपॉक्स (देवी) सारख्या रोगांवर मात करता आली. असाच विजय कोरोनावर मिळवता येईल.

यामुळे महाराष्ट्रात वाढला कोरोना

महाराष्ट्र आणि केरळमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. कोरोनाला पळवून लावण्यासाठी सोशल डिस्टंसिंग अत्यंत आवश्यक आहे. डायबिटीज आणि हायपरटेन्शनचे पेशंटही आपल्या राज्यात सर्वाधिक आहेत. त्यांना कोरोना होण्याची शक्यता जास्त असते. भरीस भर म्हणून उन्हाळ्याची सुरवात झाल्याने उन्हाचा प्रकोप दिसून येतोय. गेल्या वर्षीही याच महिन्यांमध्ये कोरोना वाढला होता. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून कोरोनाची पहिली लाट पूर्णपणे गेलेली नव्हती. त्याचे परिणाम दिसून येत आहेत. या प्रमाणाचे काही जिल्ह्यांमध्ये व्हायरसमध्ये म्युटेशन झाल्याचे दिसून येते. या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून येते.

लसीकरणानंतरही कोरोना होणे शक्य

सध्या असा समज रुजतोय की लस घेतली की कोरोना होणार नाही. पण तसे नाही. लस घेतल्यावरही कोरोना होऊ शकतो. पण हा कोरोना सौम्य स्वरुपाचा असेल. त्याची लक्षणे जिवघेणी नसतील. लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोना झाला तरी जीव जाण्याचे प्रमाण कमी असेल. म्हणजे दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर लस तुमचा जीव वाचवू शकते. कोरोना होणार नाही, याची गॅरंटी देऊ शकत नाही.

हेही वाचा - मुंबईत कोरोना रुग्ण वाढ सुरूच, 1708 नवे रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

नवीन लाटेत मृत्यूचे प्रमाण कमी

सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात बहुतांश रुग्ण सौम्य स्वरुपाच्या कोरोनाने ग्रस्त आहेत. लोकांना आता कोरोनाचा सराव झालाय, असे म्हणता येऊ शकते. कोरोना झाला तर काय करावे हे लोकांना माहित आहे. तसेच गेल्या वर्षभरात वैद्यकिय यंत्रणेला कोरोनावरील उपचारांचा मोठा अनुभव आलाय. पहिली लाट आली तेव्हा रुग्णांवर उपचार कसे करायचे हे एक मोठे आव्हान होते. तेव्हा मृत्युचे प्रमाण जास्त राहिले. आयसीयूमधील रुग्णांची संख्या जास्त असल्याने बऱ्याच लोकांनी जीव गमावला. आता तशी परिस्थिती नाही. केवळ मृत्युचे प्रमाण कमी झाले नाही तर रुग्ण बरे होण्याची संख्याही आपण वाढवू शकलो.

२०२४ पर्यंत कोरोना राहिल सोबत

लसीकरण आणि मास्क हे दोनच कोरोनावर उपाय आहेत. या दोन गोष्टींच्या माध्यमातून आपण कोरोनावर मात करु शकतो. पण सध्याच्या लसीकरणाची गती बघितली तर कोरोनावर मात करता येईल एवढी क्षमता भारतीय लोकसंख्येत विकसित करण्यास वेळ लागेल. त्यानंतरही सुमारे वर्षभर मास्क वापरावा लागेल. माझ्यामते कोरोनाला संपुष्टात आणण्यासाठी सुमारे २०२४ उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला आधीप्रमाणे जगता येईल. तोवर आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल.

हेही वाचा - मास्क व्यवस्थित घातला नाही तर प्रवाशांना विमानातून उतरवावे-डीजीसीआयचे आदेश

Last Updated : Mar 14, 2021, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.