ETV Bharat / city

'सरकारला #CAA आणि #NRC रद्द करण्यास भाग पाडू'

देशभरात CAA आणि NRC विरोधात निदर्शने होत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेला हा कायदा घटनाबाह्य आहे. तो देशातील नागरिकांवर जबरदस्तीने लादला जात असल्याचे मत, माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.

yashwant sinha and shatrughan sinha
यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा
author img

By

Published : Jan 4, 2020, 9:15 PM IST

मुंबई - CAA आणि NRC विरोधात मुंबई ते दिल्ली 9 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत 'गांधी शांती यात्रा' काढण्यात येणार आहे. देशभरात CAA आणि NRC विरोधात निदर्शने होत आहेत. त्यामुळे सरकारला CAA आणि NRC रद्द करण्यास भाग पाडू , असे यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले. केंद्र सरकारने लागू केलेला कायदा घटनाबाह्य आहे आणि तो देशातील नागरिकांवर जबरदस्तीने लादला जात असल्याचे मत माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.

यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांची संयुक्त पत्रकार परिषद...

हेही वाचा... 'ज्यांच्या बापजाद्यांनी ब्रिटिशांचे पाय चाटले ते आमच्याकडे नागरिकत्वाचा पुरावा मागतायेत'

CAA हा घटनाबाह्य असून तो जबरदस्तीने लादला जात आहे. विद्यार्थ्यांवर होणारे अत्याचार, निदर्शनावर बंदी, हे सर्व करून सरकारला काय स्पष्ट करायचं आहे ? तसेच सरकारने देशाची तुलना चीन बरोबर केली पाहिजे. सरकार मात्र देशाची तुलना पाकिस्तान बरोबर करत आहे. त्यामुळे या सरकारची मानसिकता काय आहे, हे देखील यावरून कळत असल्याचे यशवंत सिन्हा यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा... शिवसेनेला मोठा धक्का, अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

भारत राष्ट्राची संकल्पना आणि नागरिकत्व यांच्या पायावरच घाला घालणाऱ्या स्पष्ट राजकीय हालचाली गेली सहा वर्षांपासून चालू आहेत. आसाममधल्या जनतेच्या नागरिकत्वावर गेली अनेक दशके हल्ले होत आहेत. सरकार सुधारित नागरिकत्व कायद्याच्या आधारे एकीकडे सरकार भारतीयांच्या एका गटाला एनआरसीपासून वाचवले जाईल, असे आश्वासन देत आहे. तर दुसरीकडे भारतीय मुस्लीम समाजाला सरळ सरळ लक्ष्य करत आहे, असे मत यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले.

हेही वाचा... खळबळजनक : राजस्थानमधील जे. के लोन रुग्णालयात अर्भक मृत्यूंचा आकडा १०७ वर; केंद्रीय आरोग्य पथक दाखल

'गांधी शांती यात्रा' ही ९ जानेवारीपासून मुंबईहून निघेल. त्यानंतर पुणे, गुजरात, राजस्थान आणि शेवटी 30 जानेवारीला राजघाटवर पोहोचेल. जसजशी ही शांती यात्रा पुढे जाईल, तस तसे नागरिक आणि विद्यार्थी या यात्रेत सहभागी होतील. या गांधी शांती यात्रेत शेतकरी जागर मंच, राष्ट्र मंच, फ्रेंड्स ऑफ डेमोक्रॉसी या संघटनांचा समावेश असणार आहे.

Intro:CAA आणि NRC रद्द करण्यास भाग पाडू - यशवंत सिन्हा

CAA आणि NRC विरोधात मुंबई ते दिल्ली 9 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत गांधी शांती यात्रा काढण्यात येणार आहे. देशभरात CAA आणि NRC विरोधात निदर्शन आणि आंदोलन होत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेला कायदा घटनाबाह्य आहे तो देशातील नागरिकांवर जबरदस्तीने लादला जात असल्याचे मत माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केलं आहे.

CAA हा घटनाबाह्य असून तो जबरदस्तीने लादला जात आहे, विद्यार्थ्यांवर होणारे अत्याचार, निदर्शनावर बंदी, हे सर्व करून सरकारला काय स्पष्ट करायचं आहे? तसेच सरकारने देशाची तुलना चायना बरोबर केली पाहिजे पण सरकार देशाची तुलना पाकिस्तान बरोबर करत असते, त्यामुळे या सरकारची मानसिकता काय आहे, हे देखील यावरून कळतं अस यावेळी यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केलं.

भारतीय राष्ट्राची संकल्पना आणि नागरिकत्व यांच्या पायावरच घाला घालणाऱ्या स्पष्ट राजकीय हालचाली गेली सहा वर्षांपासून चालू आहेत. आसाममधल्या जनतेच्या नागरिकत्वावर गेली अनेक दशके हल्ले होत आहेत. सरकार सुधारित नागरिकत्व कायद्याच्या आधारे एकीकडे सरकार भारतीयांच्या एका गटाला एन आर सी पासून वाचवले जाईल असं आश्वासन देतं, आणि दुसरीकडे भारतीय मुसलमान गटाला सरळ सरळ लक्ष करतात असं मत यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केलं.

गांधी शांती यात्रा ही ९ जानेवारी पासून मुंबईहून निघेल, नंतर पुणे, गुजरात, राजस्थान आणि शेवट 30 जानेवारीला राजघाटवर पोहचेल, ज्या पद्धतीने ही शांती यात्रा पुढे - पुढे जाईल त्यापद्धतीने नागरिक आणि विद्यार्थी या यात्रेत सहभागी होतील.

या यात्रेत शेतकरी जागर मंच, राष्ट्र मंच, फ्रेंड्स ऑफ डेमोक्रॉसी, या संघटनांचा समावेश गांधी शांती यात्रामध्ये असणार आहे.Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.