ETV Bharat / city

दीड वर्षानंतर उघडणार नाटकाचा पडदा, रंगकर्मींनी सुरू केल्या तालमी

author img

By

Published : Oct 21, 2021, 9:49 PM IST

२२ ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृहे खुली होणार आहेत. तयारी सुरू झाली आहे आणि कलाकारदेखील कामाला लागले आहेत. व्यवसायिक नाटक निर्माते सरकारच्या पन्नास टक्के उपस्थिती या निर्णयावर नाराज आहेत. मात्र दुसरीकडे प्रायोगिक आणि स्पर्धा करणारे युवा कलाकार आनंदात आहेत. भांडुप येथील भांडुप कलाकार कट्टा या ग्रुपने देखील तालमीला सुरुवात केली आहे व अखेर नाट्यगृह सुरू होत असल्याने त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

दीड वर्षानंतर उघडणार नाटकाचा पडदा
दीड वर्षानंतर उघडणार नाटकाचा पडदा

मुंबई - सिनेप्रेमी आणि नाटक प्रेमींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. राज्यात उद्यापासून सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू होणार आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या जीआरनुसार २२ ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृहे खुली होणार आहेत. तयारी सुरू झाली आहे आणि कलाकारदेखील कामाला लागले आहेत. व्यवसायिक नाटक निर्माते सरकारच्या पन्नास टक्के उपस्थिती या निर्णयावर नाराज आहेत. मात्र दुसरीकडे प्रायोगिक आणि स्पर्धा करणारे युवा कलाकार आनंदात आहेत. भांडुप येथील भांडुप कलाकार कट्टा या ग्रुपने देखील तालमीला सुरुवात केली आहे व अखेर नाट्यगृह सुरू होत असल्याने त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

रंगीत तालीमला सुरुवात

राज्यात अखेर 22 ऑक्टोबर पासून नाट्यगृहांमध्ये तिसरी घंटा वाजणार आहे आणि यासाठी पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना खुर्च्यांवर खिळवून ठेवण्यासाठी कलाकारांनीदेखील आपल्या अभिनयाचा कस लावायला सुरुवात केली आहे. यासाठी कलाकारांनी त्यांच्या रंगीत तालीमींनादेखील सुरुवात केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोना काळामुळे नाट्यगृहाचे पडदे उघडले गेले नव्हते.

अखेर मागणी पूर्ण झाली

अनेक व्यावसायिक रंगभूमीवरील कलाकारांवर आर्थिक विवंचना होतीच. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मकडे प्रेक्षकांचा कल वाढलेला पाहायला मिळाला, त्यामुळे अखेर लवकरात लवकर रंगभूमीचे पडदे उघडले जावेत, अशी मागणी कलाकारांकडून होऊ लागली होती. अखेर राज्य सरकारने काही नियमावली जारी करत 22 ऑक्टोंबर पासून सिनेमागृह आणि रंगभूमीसाठी परवानग्या दिल्या. त्यामुळे अखेर कलाकारांनी आपली मरगळ झटकत नाटकांच्या रिहर्सलला सुरुवात केली आहे.

प्रायोगित नाटकाच्या तालमी सुरू

व्यवसायिक नाटकांत सोबतच प्रायोगिक नाटकांच्या तालमीदेखील सध्या जोरात सुरू आहेत. भांडुप कलाकार कट्याचे कलाकारदेखील सध्या प्रायोगिक नाटकाच्या तालमीला लागले आहेत. सध्या कलाकारांकडून आणि तंत्रज्ञान कडून नाटकाच्या सरावाची लगबग सुरू आहे. दर्जेदार नाटके प्रेक्षकांसमोर घेऊन पुन्हा रंगभूमीकडे प्रेक्षकांना वळविण्यासाठी या कलाकारांची धडपड सध्या दिसून येते.

गेल्या दीड वर्षापासून व्यवसायिक नाटक बंद आहेत. अखेर तिसरी घंटा वाजली आहे. कलाकारांची मोठी गळचेपी या दिवसांमध्ये झाली होती. शेवटी नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आम्ही ही मरगळ झटकून तयारीला लागलो आहोत, प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी नाट्यगृहाकडे यावे असे नाट्य निर्माता निलेश गुंडाळे यांनी सांगितले.

नाट्यगृह सुरू होत असल्यामुळे खूप आनंद होत आहे. जशी व्यावसायिक रंगभूमी थांबली होती. त्या प्रकारे प्रायोगिक रंगभूमी देखील थांबली होती. नवीन येणाऱ्या होतकरू कलाकारांना व्यासपीठ मिळत नव्हते. व्यावसायिक रंगभूमीला काही प्रमाणात मरगळ असेल कारण कारण ही रंगभूमी 50 टक्के प्रेक्षक उपस्थितीमध्ये सुरू होणार आहे. मात्र दुसरीकडे स्पर्धा नाटक करणारे कलाकारांमध्ये मात्र मोठ्या उत्साह आहे. काही स्पर्धांची आता घोषणा झालेली आहे. यामुळे नवकलाकारांना मध्ये उत्साह भरलेला आहे असे दिग्दर्शक प्रशांत विचारे यांनी सांगितले.

हेही वाचा - मराठी चित्रपट ‘जयंती’ने बॉलिवूड चित्रपट ‘अंतिम’ बरोबरचा टाळला प्रदर्शन-क्लॅश!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.